Homeब्लॅक अँड व्हाईटभारतातल्या पहिल्या राष्ट्रीय...

भारतातल्या पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोडचे अनावरण!

निती आयोगाचे सदस्य (विज्ञान आणि तंत्रज्ञान) डॉ. व्ही. के. सारस्वत यांच्या हस्ते मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रस्ता भागाचे नुकतेच उद्घाटन झाले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR-CRRI) यांनी विकसित केलेले स्टील स्लॅग रस्ते तंत्रज्ञान पोलाद उद्योगांच्या कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करत आहे. सोबतच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (NHAI) देशात मजबूत आणि पर्यावरणपूरक राष्ट्रीय महामार्ग निर्माण करण्यासाठी मदत करत आहे, असे डॉ. सारस्वत यांनी प्रसंगी बोलताना सांगितले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्था यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली जेएसडब्ल्यु स्टील कंपनीने राष्ट्रीय महामार्ग – 66 मुंबई-गोवाच्या इंदापूर-पनवेल विभागात 1 किमी लांबीचा चार पदरी स्टील स्लॅग रस्त्याचा भाग बांधला आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी सुमारे 80,000 टन CONARC स्टील स्लॅगचे रायगड जिल्ह्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यु स्टील प्रकल्पात प्रक्रिया केलेले स्टील स्लॅग एग्रीगेट्स म्हणून रूपांतरित करण्यात आले आहेत.

जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेड चे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एस राठोड यांनी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्था यांनी केलेल्या प्रयत्नांचे तसेच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जेएसडब्ल्यु स्टील लिमिटेडला हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मिळालेल्या सहकार्याचे कौतुक केले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्था पोलाद मंत्रालयाच्या प्रायोजित संशोधन प्रकल्पांतर्गत, स्टील स्लॅग रोड बांधकामात प्रक्रिया केलेल्या स्टील स्लॅगच्या वापरासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे विकसित करत आहे, अशी माहिती वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेचे संचालक डॉ. मनोरंजन परिडा यांनी दिली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेने विविध पोलाद उद्योगांच्या सहकार्याने गुजरात, झारखंड आणि अरुणाचल प्रदेश येथे रस्ते बांधणीत स्टील स्लॅगचा यशस्वीरित्या वापर केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई विभागाचे प्रादेशिक अधिकारी तसेच मुख्य महाव्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी सांगितले की स्टील स्लॅग रस्ता त्याच्या नवीन तांत्रिक वैशिष्ट्यांसाठी आणि अपवादात्मक कामगिरीसाठी ओळखला जातो. या तंत्रज्ञानाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रशंसा मिळवली आहे, असेही ते म्हणाले.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content