Friday, October 18, 2024
Homeएनसर्कलओला इलेक्ट्रिकची हार्वेस्ट फेस्टिव्हल...

ओला इलेक्ट्रिकची हार्वेस्ट फेस्टिव्हल ऑफर!

ओला इलेक्ट्रिकने आज देशभरात कापणीचा (हार्वेस्ट) सण सुरू होण्याच्या निमित्ताने 15,000 रूपयांपर्यंतच्या आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. १५ जानेवारीपर्यंत असणाऱ्या या ऑफरमध्ये S1 Pro आणि S1 Airच्या खरेदीवर ₹ 6,999पर्यंतची मोफत विस्तारित बॅटरी वॉरंटी, 3,000 रूपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि आकर्षक ऑफर्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, S1 X+ INR 89,999 वर INR 20,000च्या सवलतीसह उपलब्ध राहील.

खरेदीदार निवडक क्रेडिट कार्ड EMIवर INR 5,000पर्यंत सवलत मिळवू शकतात. इतर फायनान्स ऑफर्समध्ये शून्य डाउन पेमेंट, नो-कॉस्ट EMI, शून्य-प्रक्रिया शुल्क आणि 7.99% इतके कमी व्याजदर यासारख्या इतर डील्सचा  समावेश आहे.

ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच आपल्या स्कूटर पोर्टफोलिओचा पाच उत्पादनांमध्ये विस्तार केला आहे. S1 Pro (दुसरी जनरेशन)ची किंमत INR 1,47,499 आहे, तर S1 Air INR 1,19,999मध्ये उपलब्ध आहे. विविध प्राधान्यांसह रायडर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी याने S1X हे तीन प्रकारांमध्ये – S1 X+, S1 X (3kWh), आणि S1 X (2kWh)मध्येदेखील सादर केले आहे. S1 X (3kWh) आणि S1 X (2kWh) साठी आरक्षण विंडो फक्त INR 999मध्ये खुली आहे आणि ती अनुक्रमे INR 99,999 आणि INR 89,999च्या प्रास्ताविक किमतीत उपलब्ध असेल.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content