Homeकल्चर +बालसाहित्यावर आधारित रंगला...

बालसाहित्यावर आधारित रंगला ‘साहित्यरंग महोत्सव’!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सादर केलेला “साहित्यरंग महोत्सव” अतिशय रंगतदार झाला. ‘अनिकेत श्रीखंडे मेमोरियल ट्रस्ट’ने सहकार्य केलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन ग्रंथालीचे संस्थापक दिनकर गांगल यांच्या हस्ते करण्यात आले. बालसाहित्यावर आधारित या साहित्यरंग महोत्सवासाठी बालकांची उपस्थिती लक्षणीय होती.

यावेळी स्वाती महाळंक यांनी ‘असे फुलले बालसाहित्य’ या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण व रंजक असे व्याख्यान दिले. त्यानंतर ‘किलबिल’ हा बालगीतांचा कार्यक्रम केंद्राच्या संगीत वर्गाच्या बाल विद्यार्थ्यांनी सुरेल आणि तयारीने सादर केला. ‘बालसाहित्याचा प्रवास’ या शीर्षकाअंतर्गत कथा, कविता, गीते, नाट्यछटा असे बालसाहित्याचे अनेक प्रकार विविध वयोगटाच्या मुलांनी अप्रतिम सादर केले. त्यानंतर विद्याधर गोखले लिखित ‘फुलवा मधुर बहार’ हे बहारदार बालनाट्य कलांगणतर्फे वर्षा भावे यांनी सादर केले. कलांगणच्या बालकलाकारांनी अभिनयाने आणि गाण्यांनी फार मजा आणली. नेपथ्यही साजेसे आणि सुंदर होते. महोत्सवाला बालांनी आणि मोठ्यांनीही उत्तम प्रतिसाद दिला.

Continue reading

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...
Skip to content