Homeएनसर्कलजम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये...

जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये एनसीसीची आणखी चार युनिट्स!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी) आणखी चार युनिट्स वाढवण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे.

यामध्ये उधमपूर (जम्मू आणि काश्मीर), कुपवाडा (जम्मू आणि काश्मीर) आणि कारगिल (लडाख) येथे प्रत्येकी एक मिश्र (मुले आणि मुली) लष्करी बटालियन आणि उधमपूर (जम्मू आणि काश्मीर) येथे एक हवाई तुकडी यांचा समावेश आहे. परिणामी जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 27,870 कॅडेट्सची सध्याची संख्या 12,860 कॅडेट्सने वाढवली जाईल. अशा प्रकारे त्यात 46.1 टक्क्याने वाढ होईल.

सध्या, संचालनालयाची दोन गट मुख्यालये आहेत, एकूण 10 एनसीसी युनिट्स आहेत, ज्यात तीनही भौगोलिक प्रदेशांचा समावेश आहे. या विस्तारामुळे प्रदेशातील तरुणांचे मनोबल वाढेल, जे राष्ट्र उभारणीत महत्त्वाचे योगदान देतील.

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content