Homeब्लॅक अँड व्हाईटउत्कृष्ट प्रशासनाच्या पंतप्रधान...

उत्कृष्ट प्रशासनाच्या पंतप्रधान पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज!

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागातर्फे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेच्या पंतप्रधान पुरस्कार 2023साठी योजना आणि वेब पोर्टल (http://www.pmawards.gov.in)चे नुकतेच उदघाटन करण्यात आले. सर्व प्रधान सचिव (एआर) / (आयटी), आणि सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्हाधिकारी / जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे उदघाटन समारंभात सामील होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. वैध नोंदणी आणि अर्ज दाखल करण्याकरिता पंतप्रधान पुरस्कार वेब पोर्टलवर नोंदणी सुरू झाली आहे आणि ती 31 जानेवारी 2024पर्यंत करण्यात येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 2014पासून पंतप्रधान उत्कृष्टता पुरस्कारांच्या एकंदर संकल्पना आणि स्वरूपामध्ये क्रांतिकारी बदल झाला आहे. या योजनेचा उद्देश रचनात्मक स्पर्धा, नवोन्मेष, प्रतिकृती आणि सर्वोत्तम पद्धतींच्या संस्थापनाला प्रोत्साहन देणे हा आहे. या दृष्टिकोनांतर्गत, केवळ परिमाणवाचक उद्दिष्टे साध्य करण्यावर भर न देता सुशासन, गुणात्मक कामगिरी आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत संपर्क सुविधेवर भर दिला जाईल. पुरस्कार योजनेची आता, यावर्षी, लक्ष्यित वैयक्तिक लाभार्थींद्वारे जिल्हाधिकार्‍यांची कामगिरी जोखण्यासाठी आणि सारासार दृष्टिकोनातून अंमलबजावणीसाठी पुनर्रचना करण्यात आली आहे. या उद्दिष्टासह, पुरस्कारांसाठीच्या अर्जांचे मूल्यमापन सुशासनात्मक, गुणात्मक आणि परिमाणात्मक अशा तीन घटकांवर केले जाईल.

सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेच्या पंतप्रधान पुरस्कार 2023 या योजनेत सर्व जिल्ह्यांनी सहभाग घेणे अपेक्षित आहे.

नागरी सेवकांचे योगदान दोन श्रेणींमध्ये जाणून घेणे हे सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टता पंतप्रधान पुरस्कार 2023च्या योजनेचे उद्दिष्ट आहे:

श्रेणी 1ः 12 प्राधान्य क्षेत्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास. या श्रेणी अंतर्गत 10 पुरस्कार प्रदान केले जातील.

श्रेणी 2: केंद्रीय मंत्रालये/विभाग राज्ये, जिल्ह्यांसाठी नवोन्मेष. या श्रेणी अंतर्गत 6 पुरस्कार प्रदान केले जातील.

विचाराधीन कालावधी 1 एप्रिल 2021 ते 31 जानेवारी 2024 आहे. सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेच्या पंतप्रधान पुरस्कार 2023 अंतर्गत एकूण पुरस्कारांची संख्या 16 असेल.

मूल्यमापन प्रक्रियेमध्ये (i) स्क्रीनिंग समिती (पहिला आणि दुसरा टप्पा), (ii) तज्ञ समितीद्वारे मूल्यांकन आणि (iii) अधिकारप्राप्त समितीद्वारे जिल्हा/ संस्थांची निवडक यादी करण्यात येईल. पुरस्कारांसाठी अधिकारप्राप्त समितीच्या शिफारशींवर पंतप्रधानांची मंजुरी घेतली जाईल.

पंतप्रधान पुरस्कार 2023 मध्ये पुढील गोष्टींचा समावेश असेल: (i) चषक (ii) सन्मानपत्र आणि (iii) 20 लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम. पुरस्कारप्राप्त जिल्हा /संस्थेला प्रकल्प /कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी किंवा सार्वजनिक कल्याण क्षेत्रातील कोणत्याही विभागातील संसाधनातील तफावत भरून काढण्यासाठी ती रक्कम वापरण्यात येणार आहे.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content