Homeहेल्थ इज वेल्थआरोग्य विम्यासाठी 'पे...

आरोग्य विम्यासाठी ‘पे नियरबाय’ आणि ‘स्टार हेल्थ’ एकत्र!

भारतातील आघाडीचे शाखारहित बँकिंग आणि डिजिटल नेटवर्क पे नियरबाय आणि भारतातील आघाडीच्या आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स यांनी संपूर्ण देशात, विशेषतः निमशहरी आणि ग्रामीण भागात आरोग्य विमा संरक्षण अधिक सुलभ आणि परवडणारे बनवण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. स्टार हेल्थची क्युरेट केलेली विमा उत्पादने स्थानिक रिटेल स्टोअरमध्ये आणून पे नियरबायच्या लाखोंहून अधिक सक्रिय वितरण सेवा (DaaS) नेटवर्कद्वारे देशभरातील लाखो विमा नसलेल्या व्यक्तींचा विमा काढण्यासाठी हा धोरणात्मक सहयोग महत्त्वपूर्ण ठरेल.

आरोग्य विम्याला भारतापर्यंत पोहोचण्यासाठी, एक नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आवश्यक आहे. यामुळे किफायतशीर विमा संरक्षण मिळेल, सहज उपलब्ध असेल आणि जास्त कागदपत्रांची गरज दूर करेल. स्टार हेल्थ – पे नियरबाय सहयोगामुळे ग्राहक आता त्यांच्या विश्वासू स्थानिक किरकोळ विक्रेत्यांच्या सहाय्याने त्यांच्या जवळच्या रिटेल दुकानातून तयार केलेल्या विमा योजना सोयीस्करपणे खरेदी करू शकतील. पे नियरबाय च्या मजबूत Daas नेटवर्कद्वारे २२,०००हून अधिक पिन कोडमध्ये ग्राहकांना स्टार हेल्थकडून समूह वैयक्तिक अपघात आणि HospiÇash पॉलिसींसह विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण आरोग्य विमा उत्पादनांमध्ये अखंड प्रवेश मिळेल. पे नियरबायशी भागीदारी असलेले किरकोळ विक्रेते ग्राहकांना संपूर्ण खरेदी प्रवासात हाताशी धरून, झटपट आणि त्रास-मुक्त विमा सेवा जारी करणे सुनिश्चित करतील. स्टार हेल्थची सुलभ दाव्यांची प्रक्रिया, तज्ज्ञ डॉक्टरांशी मोफत टेलिमेडिसिन सल्लामसलत, वैयक्तिक आरोग्यस्वास्थ्य कार्यक्रम आणि मोफत वार्षिक आरोग्य तपासणी यासारख्या मूल्यवर्धित योजना विमा अनुभव उंचावतील.

या भागीदारीबद्दल भाष्य करताना, पे नियरबायचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कुमार बजाज म्हणाले की, भारत खऱ्या अर्थाने प्रगतीशील होण्यासाठी, जनतेसाठी सरलीकृत आरोग्य विमा सेवांचे प्रमाण वाढवण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्वांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे सुकर होते. तथापि, अलीकडील पे नियरबाय भारत हेल्थ इंडेक्स (BHI) 2023च्या अहवालानुसार, भारताच्या शेवटच्या टप्प्यातील विमा जागरुकतेची पातळी अत्यंत कमी आहे. ५५% लोकांनी विम्याबद्दल कधीच ऐकले नाही आणि ज्यांना विम्याची माहिती आहे त्यापैकी केवळ ३२% लोकांनी त्यांच्या आयुष्यात कोणत्यातरी स्वरूपात विमा घेतला होता. शिवाय, लक्षणीय ३८% लोकांनी परवडत नसणे हा एक मोठा अडथळा असल्याचे नमूद केले, तर ३६% लोकांना विमा कोठून घ्यावा हे माहित नव्हते. आरोग्य संरक्षणाबाबत, ३२% लोकांनी आरोग्य विमा कंपन्यांची मर्यादित उपलब्धता आणि माहितीच्या अभावाचा उल्लेख  प्राथमिक आव्हान म्हणून केला. जास्त प्रीमियम आणि जटिल दस्तऐवजीकरण प्रक्रियाही मोठी आव्हाने असल्याचे दिसून आले. ही संख्या चिंताजनक असली तरी यात एक संधीदेखील आहे. जीवनाच्या अनिश्चिततेपासून प्रत्येक नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी उत्पादनाचे सार्वत्रिकीकरण आणि वितरणामध्ये प्रगती साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी आहे. 

भारतात विम्याचे प्रमाण वाढविण्यासाठी त्याची प्रक्रिया समजण्यास सोपी आणि वापरण्यास सुलभ केली जाणे गरजेचे आहे. स्टार हेल्थसोबतची आमची भागीदारी दर्जेदार आरोग्य विमा संरक्षण किफायतशीर पद्धतीने आणि प्रत्येकासाठी, सर्वत्र उपलब्ध करून देण्याची आमची बांधिलकी अधिक दृढ करते. देशात अधिक चांगल्या प्रकारे विमा सेवा सुविधा विस्तारण्यासाठी आणि लोकांना स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षित, चांगल्या भविष्यासाठी योग्य विमा सेवा मिळेल याची खात्री करण्यासाठी एकत्रितपणे, आम्ही अत्यंत आवश्यक कृती करत आहोत. या उपक्रमास मदत करणारे आमचे आरोग्य प्रतिनिधी असतील. हर एक व्यक्तीपर्यंत पोहोचून, विमा नसलेल्यांचा विमा काढण्यात मदत मिळण्याची खातरजमा करत ते आरोग्य विमा जागरूकता पसरविण्यात मदत करतील.

स्टार हेल्थचे चीफ इनोव्हेशन ऑफिसर चिट्टी बाबू म्हणाले की, स्टार हेल्थमध्ये आमचा विश्वास आहे की आज अन्न, पाणी आणि निवारा यासोबतच आरोग्य विमा ही मूलभूत गरज बनली आहे. या विश्वासातून लोकांचा सामाजिक स्तर विचारात न घेता त्‍यांना दर्जेदार आरोग्‍यसेवा मिळण्‍यासाठी सक्षम करत प्रत्‍येक व्‍यक्‍ती कुठेही राहत असली तरी तिचा विमा उतरवलेला असेल यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना चालना मिळते. पे नियरबायची मजबूत उपस्थिती आणि भारतातील ग्रामीण आणि नॉन-मेट्रो क्षेत्रांमध्ये पसरलेले त्यांचे सखोल नेटवर्कमुळे त्यांच्या सहयोगाने प्रत्येकासाठी पुरेसे आरोग्य विमा संरक्षण पुरवत या दिशेने आणखी एक पाऊल आहे. ही भागीदारी भारतातील विमा वंचित लोकांपर्यंत विमा सेवा पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content