Homeचिट चॅटकुनो उद्यानात 'आशा'ने...

कुनो उद्यानात ‘आशा’ने दिल्या ३ छाव्यांना जन्म!

कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणण्यात आलेल्या आशा नावाच्या मादी चित्त्याने तीन पिलांना जन्म दिला आहे.

केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाजमाध्यमांवर जारी केलेल्या संदेशात ही माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे, की कुनो राष्ट्रीय उद्यानात तीन नवीन छाव्यांचे आगमन झाले आहे. ‘आशा’ या नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याने या गोड छाव्यांना जन्म दिला आहे.

कुनो

केंद्रीय मंत्री यादव म्हणाले की, भारतात वन्यजीव आणि पर्यावरण समतोल निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्ट चित्ता, या प्रकल्पाला मिळालेले हे घवघवीत यश आहे. या प्रकल्पात सहभागी असलेले सर्व तज्ञ, कुनो वन्यजीव अभयारण्याचे अधिकारी आणि देशभरातील वन्यजीव प्रेमी यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content