Homeहेल्थ इज वेल्थआयुर्वेद अध्यापकांसाठी 'स्मार्ट...

आयुर्वेद अध्यापकांसाठी ‘स्मार्ट 2.0’ कार्यक्रमाची सुरुवात

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (सीसीआरएएस) आणि भारतीय औषध प्रणालीसाठीचा  राष्ट्रीय आयोग (एनसीआयएसएम) यांनी एकत्र येऊन ‘स्मार्ट (SMART) 2.0’ म्हणजेच स्कोप फॉर मेनस्ट्रीमिंग आयुर्वेद रिसर्च अमंग टीचिंग प्रोफेशनल्स (अध्यापन व्यावसायिकांमध्ये आयुर्वेद संशोधनाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी) कार्यक्रम सुरू केला आहे. देशभरातील आयुर्वेद प्रशिक्षण संस्था /रुग्णालयांच्या परस्पर सहयोगाने, आयुर्वेदाच्या प्रमुख क्षेत्रांमधील वैद्यकीय शिक्षणाला चालना देणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे.

बाल कासा, कुपोषण, अपुरे स्तनपान, गर्भाशयातून अती रक्तस्त्राव, महिलांमधील रजोनिवृत्तीनंतरचा ऑस्टिओपोरोसिस आणि मधुमेह (डीएम) II या प्राथमिक संशोधन क्षेत्रांमधील सुरक्षितता, सहनशीलता आणि आयुर्वेद सूत्रांचे पालन हे या अभ्यासाचे उद्दिष्ट असल्याचे सीसीआरएएसचे डीजी प्रा. (व्हीडी) रबीनारायण आचार्य यांनी सांगितले.

सीसीआरएएस, ही आयुर्वेदातील वैज्ञानिक आधारावरील संशोधनाची निर्मिती, समन्वय, विकास आणि प्रोत्साहनाला चालना देणारी सर्वोच्च संस्था असून, ही संस्था आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. आंतरविद्याशाखीय संशोधन पद्धती वापरून आयुर्वेदिक उपचारांची परिणामकारकता आणि सुरक्षितता प्रदर्शित करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये त्याचा उपयोग करण्यासाठी ठोस पुरावे निर्माण करणे, हे ‘स्मार्ट 2.0’ कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. ‘स्मार्ट 1.0’ अंतर्गत, 38 महाविद्यालयांमधील अध्यापन व्यावसायिकांच्या सक्रिय सहभागाने सुमारे 10 रोगांवर काम करण्यात आले. 

‘स्मार्ट (SMART) 2.0’ कार्यक्रमा अंतर्गत सहयोगी संशोधन उपक्रम राबवण्यासाठी उत्सुक आयुर्वेद शिक्षण संस्थांनी, सीसीआरएएस वर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यामध्ये ‘सहयोगासाठीचा’ आपला अर्ज दाखल करावा.

इच्छुकांनी http://ccras.nic.in/sites/default/files/Notices/02012024_SMART.pdf या वेबसाईटवर माहिती अथवा प्रश्न 10 जानेवारी रोजी किंवा त्यापूर्वी  ccrassmart2.0@gmail.com या ईमेलवर आणि त्याची एक प्रत President.boa@ncismindia.org येथे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...

प्राध्यापक डॉक्टर भ्रष्टाचारी? जे. जे. रुग्णालयात खळबळ!

मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयाच्या अस्थिरोगशास्त्र (आर्थॉपेडिक्स) विभागात एका वरिष्ठ प्राध्यापकाविरुद्ध अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आरोप झाल्यामुळे वैद्यकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रा. डॉ. नितीन महाजन यांच्यावर निवासी डॉक्टरांचा मानसिक व आर्थिक छळ करणे, बनावट सह्या करणे आणि...
Skip to content