जागतिक आर्थिक शक्तीस्थान म्हणून भारताचे स्थान उंचावण्यासाठी येत्या काही महिन्यांत विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. दिनांक 3 ते 10 जानेवारी 2024 दरम्यान भारत मंडपम, नवी दिल्ली येथे नियोजित ‘आत्मनिर्भर भारत उत्सव’ यापासून या विशाल क्रमवार उपक्रमांची नियोजित मालिका सुरू होते आहे. कारागीर, विणकर, खादी, आदिवासी हस्तकला, एमएसएमई आणि कुटीरोद्योग यांच्या विविध उत्कृष्ट उत्पादनांच्या समृद्ध श्रेणीसह, उत्पादक आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद साधणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वाखालील सरकार भारताला मध्यम,लघू आणि सूक्ष्म उद्योगांना जागतिक स्तरावर बैठका, प्रोत्साहन, परिषदा घेण्यासाठी (MICE) प्रोत्साहन देत असून भारतातील, पारंपरिक हस्तकला, कारागीरी, विणकर आणि उत्पादन कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी महत्त्वाचे स्थान अशी भारताची ओळख विश्वाला करून देण्यासाठी प्रयत्न करत आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले.

नवी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले, की, भारताला जागतिक स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण ओळख मिळवून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतले जात आहेत, जेणेकरून जगासोबत असलेल्या आर्थिक संबंधांना बळ मिळेल आणि विश्वात भारताच्या कलाविश्वाचा ठसा उमटेल. यासाठी सरकारकडून अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत.

‘इंडस फूड’ हे प्रदर्शन येत्या 8 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत इंडिया एक्स्पोझिशन मार्ट, ग्रेटर नोएडा येथे आयोजित केले जाईल. या प्रदर्शनात जवळपास 120 देशांतील सुमारे 1100हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील आणि 2500 परदेशी खरेदीदार या प्रदर्शनाकडे आकर्षित होतील अशी अपेक्षा आहे. हे प्रदर्शन मूल्यवर्धित कृषी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करत असून, त्याद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण करणे यावरही याद्वारे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

त्यानंतर, ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2024’ हे प्रदर्शन 1 ते 3 फेब्रुवारी 2024 या कालावधीत भारत मंडपम, नवी दिल्ली सर्वांचे लक्ष वेधून घेईल. 10 लाख चौरस फूट पसरलेल्या या विस्तृत मोबिलिटी प्रदर्शनात वाहन उद्योग (ऑटोमोबाईल) आणि वाहन (मोबिलिटी) क्षेत्रातील भागधारकांना त्यांची शक्ती आणि नवकल्पनांचे प्रदर्शनही असेल. प्रदर्शनात भविष्यातील (नेक्स्ट-जनरेशन) पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) उत्पादने, बांधकाम उपकरणे आणि विविध नाविन्यपूर्ण मोबिलिटी सोल्यूशन्स यासारख्या क्षेत्रांवर भर दिला जाईल.

सरतेशेवटी, ‘भारत टेक्स्ट’ हे प्रदर्शन 26 ते 29 फेब्रुवारी 2024दरम्यान भारत मंडपम आणि यशोभूमी, नवी दिल्ली या दोन्ही ठिकाणी जवळपास 20 लाख चौरस फूट जागेवर आयोजित करण्यात आले आहे. हे प्रचंड प्रदर्शन जगातील सर्वात मोठ्या वस्त्रोद्योग उद्योगांपैकी एक असेल, ज्यामध्ये पूर्ण उद्योगांतील प्रत्येक घटकाची मूल्य साखळी विचारात घेतली आहे. 3500हून अधिक प्रदर्शक, 3000 हून अधिक, परदेशी खरेदीदार आणि 40हून अधिक देशांतील सहभागासह, भारत टेक्सचे उद्दिष्ट भारताचे वस्त्रोद्योग पराक्रम आणि नाविन्य जागतिक प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करणे आहे.
मंत्री पीयुष गोयल यांनी या प्रदर्शनांचा विस्तार, आकार आणि महत्त्व, आकांक्षा यावर भर दिला आणि भारताने जागतिक स्तरावरील सहभागामध्ये केलेली क्रांती अधोरेखित केली. भारताच्या जागतिक स्तरावर वैशिष्ट्यपूर्ण स्थानावर पोहोचण्याच्या रणनीतीमध्ये महत्त्वपूर्ण बदल दर्शवून, जगभरात अधिक व्यवसाय आणि बाजारपेठेतील सहभाग वाढवण्याच्या या हेतूंवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.