Homeब्लॅक अँड व्हाईटचालू आर्थिक वर्षात...

चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 21 टक्क्यांची वाढ!

या आर्थिक वर्षासाठी (17 डिसेंबर 2023पर्यंत) तात्पुरत्या आकडेवारीनुसार प्रत्यक्ष कर संकलन 13,70,388 कोटी रुपये इतके झाले आहे. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये, याच कालावधीत 11,35,754 कोटी रुपये संकलन झाले होते, ज्यात 20.66% वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रत्यक्ष करांच्या एकूण संकलनाची प्राथमिक आकडेवारी (परताव्यासाठी समायोजन करण्यापूर्वी) 15,95,639 कोटी रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ही रक्कम 13,63,649 कोटी रुपये होती. यंदा, आर्थिक वर्ष 2022-23 च्या संकलनाच्या तुलनेत 17.01% वाढ झाली आहे.

जीएसटी

15,95,639 कोटी रुपयांच्या समग्र कर संकलनात, 7,90,049 कोटी रुपये कॉर्पोरेट कर, 8,02,902 कोटी रुपयांच्या सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स सह वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे. किरकोळ संकलनात, 6,25,249 कोटी रुपयांचा अग्रिम कर समाविष्ट आहे. तर, 7,70,606 कोटी रुपयांचा उद्गम  कर समाविष्ट आहे, 1,48,677 कोटी रुपये स्वयं-मूल्यांकन कर, 36, 651 कोटी रुपये नियमित मूल्यांकन कर आणि 14, 455 कोटी रुपये इतर किरकोळ कर संकलित झाला आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 साठीच्या  प्राथमिक आकडेवारीनुसार, 6,25,249 कोटी रुपये अग्रिम कर संकलित झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ही रक्कम, 5,21,302 कोटी रुपये इतकी होती, ज्यात यंदा 19.94% ची वाढ झाली आहे. या 6,25,249 कोटी रुपयांच्या अग्रिम करांमधे, 4,81,840 कोटी रुपये कॉर्पोरेट कर आणि 1,43,404 कोटी रुपये वैयक्तिक प्राप्तिकराचा समावेश आहे. 17 डिसेंबरपर्यंत, 2023-24 या आर्थिक वर्षासाठीचे, 2,25,251 कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आले आहेत.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content