Homeब्लॅक अँड व्हाईटदलाई लामांच्या उपस्थितीत...

दलाई लामांच्या उपस्थितीत उद्या महालक्ष्मी रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय धम्म परिषद 

मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात उद्या, 16 डिसेंबरला दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या या परिषदेस जागतिक बौद्ध धम्मगुरू दलाई लामा उपस्थित राहणार आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शनिवारी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात लाखोंच्या संख्येने बौद्ध आंबेडकरी जनतेने उपस्थित राहवे, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले.

डाॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदिक्षा समारोह समितीचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले असून कार्याध्यक्ष भदंत डॉ. राहुलबोधी महाथेरो; सरचिटणीस अविनाश कांबळे; खजिनदार पद्मश्री कल्पना सरोज आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतात ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन केले. डॉ. आंबेडकरांनी घेतलेल्या धम्मदिक्षेमुळे भारतात बौद्ध धम्माचे पुनर्जीवन झाले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉ. आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयांयासह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यावेळी त्यांनी दुसरा धम्मदीक्षेचा कार्यक्रम मुंबईत 16 डिसेंबर 1956 रोजी महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला होता. मात्र त्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर बौद्ध धम्मदीक्षा कार्यक्रम आयोजित करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. त्यांचा हा अपूर्ण राहिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी उद्या महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन  करण्यात आले आहे.

जगात आज दहशतवाद, आतंकवाद, नक्षलवाद असा हिंसाचाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट आणि हिंसाचार होत आहे. शांतता भंग होत आहे. हमास आणि इस्त्रायलचे युद्ध सुरू आहे. अनेक लोकांचे लहान बालकांचे त्यामध्ये जीव जात आहेत. हा हिंसाचार रोखला गेला पाहिजे. जगात शांततेची गरज आहे. जगात पुन्हा शांतता स्थापन करण्यासाठी; जगाला मानवतेचा विचार देण्यासाठी; भगवान बुद्धांनी दिलेल्या धम्माची; त्यांनी दिलेल्या अहिंसा, शांती, बंधुता, मैत्री या विचारांची गरज आहे.  मानवतेचा विचार भगवान बुद्धांनी दिला आहे. विश्वशांतीसाठी जगाला युद्ध नव्हे तर बुद्धांची गरज आहे, हा संदेश या परिषदेत देण्यात येणार आहे.

बौद्ध भिख्खूंनी वरळी ते महालक्ष्मी रेसकोर्सपर्यंत काढली विश्वशांती धम्म रॅली

आज यानिमित्त विश्वशांती धम्म रॅली वरळी ते महालक्ष्मी रेसकोर्सच्या मैदानापर्यंत धम्मरॅली काढण्यात आली. पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो आणि शेकडो बौद्ध भिख्खूंनी यात भाग घेतला. मोठ्या संख्येने बौद्ध भिख्खु, उपासिका सहभागी होत्या. नमो बुद्धाय,जय भिमचा नारा या रॅलीमध्ये देण्यात आला. बौद्ध धम्म संघ या त्रिरत्नांचा जयजयकार करण्यात आला. या रॅलीचा प्रारंभ वरळी येथे करण्यात येऊन  समारोप महालक्ष्मी रेसकोर्स मैदानात करण्यात आला. या रॅलीमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले वरळी ते महालक्ष्मी रेसकोर्सपर्यंत पूर्ण वेळ उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, अविनाश कांबळे; पद्मश्री कल्पना सरोज; दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे चांद्रबोधी पाटील; रिपाइं जिल्हा अध्यक्ष संजय पवार; भारतकुमार वानखेडे, सविता शिंदे, नागसेन कांबळे, सचिनभाई मोहिते आदि मान्यवरही त्यात सहभागी झाले होते.

Continue reading

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...

अध्यात्मशास्त्र दीपावलीचे!

अज्ञानाच्या अंधःकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी! दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली (रांग, ओळ) असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला सर्वत्र दिवे लावतात. चौदा...
Skip to content