Friday, October 18, 2024
Homeडेली पल्सराज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये...

राज्यातल्या सर्व पोलीसठाण्यांमध्ये अंमली पदार्थविरोधी कक्ष!

राज्यातील ड्रग तस्करीवर आळा घालण्यासाठी सर्व पोलीसठाण्यांत अंमली पदार्थविरोधी कक्षाची स्थापना करून एक टास्क फोर्सही तयार करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. आजवर राज्यात पन्नास हजार कोटी रुपयांहून जास्त किंमतीचे ड्रग्ज पकडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रश्नोत्तराच्या तासात चेतन तुपे, सुनील कांबळे, रोहित पवार, विश्वजीत कदम यांच्यासह अनेक सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी ललित पाटील याला ससून रुग्णालयात इतके दिवस कोणाच्या आशीर्वादाने ठेवण्यात आले, अशी विचारणाही या सदस्यांनी केली होती.

त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले की, ललित पाटीलला पकडल्यानंतर त्याची साधी पीसी म्हणजे पोलीस कोठडीही घेण्यात आली नव्हती. तेव्हा २ एप्रिल २०२१ला पिंपरीचे आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ३ पानी पत्र राज्य सरकारला लिहिले. त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून ललित पाटीलची पोलीस कोठडी मिळण्यासाठी परवानगी मागितली होती. पण, ती दिली गेली नाही. ललित पाटील हे उद्धवजींच्या शिनसेनेचे शहरप्रमुख होते. तरीही रुग्णालयात गंभीर गुन्ह्यातील आरोपीला इतके दिवस ठेवले गेले असेल तर ते चूकच आहे. पण, या विषयावर आम्हाला राजकारण करायचे नाही.

अंमली

ज्यांनी हे दबावाखाली केले त्यांच्यावरही कारवाई करा, ही मागणी अनिल देशमुख यांनी केली. त्यावर कारवाई केली आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

आजवर पन्नास हजार कोटींवरहून अधिक किंमतीची ड्रग्स पकडण्यात आली आहेत. ललित पाटील प्रकरणात आजवर कोणताही राजकीय सहभाग आढळून आला नाही. याप्रकरणी संबंध असलेल्या चार पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे, असं ही फडणवीस यांनी सांगितलं.

ठाण्यात पेमेंट गेटवे फसवणूक प्रकरणात सोळा हजार कोटींचा व्यवहार झाला असल्यामुळे त्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे व्यवहार राष्ट्रीय स्तरावरही असून गरज पडल्यास केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रकरणी तीन महिन्यांत तपासाचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल असंही फडणवीस म्हणाले. मूळ प्रश्न सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता. आशिष शेलार, रवींद्र वायकर, तमिळ सेल्वन यांनी उपप्रश्न विचारले.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content