Homeब्लॅक अँड व्हाईटदेशभरात 1.63 कोटी...

देशभरात 1.63 कोटी प्रॉपर्टी कार्ड्स तयार!

भारतीय सर्वेक्षण संस्थेद्वारे स्वामित्व (SVAMITVA) योजनेंतर्गत तयार केलेल्या नकाशांच्या आधारे प्रॉपर्टी (मालमत्ता) कार्ड, तयार करणे आणि त्याचे वितरण करणे ही संबंधित राज्य सरकारची जबाबदारी आहे. 6 डिसेंबर 2023पर्यंत, राज्यांनी 1.63 कोटी प्रॉपर्टी कार्ड्स तयार केली आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

State/UTNumber of Property Cards
FY-2020-2021FY-2021-2022FY-2022-2023Till 6th Dec’23
Andaman and Nicobar Islands007,4097,409
Andhra Pradesh0000
Chhattisgarh0017,55617,556
Dadra Nagar Haveli Daman Diu004,3974,397
Goa006,72,4666,72,466
Gujarat0060,3602,62,000
Haryana2,39,03711,85,01225,15,64625,15,646
Himachal Pradesh001,2001,200
Jammu and Kashmir03,3069,10010,116
Karnataka10,1211,90,0486,91,4929,37,829
Ladakh0232,7962,796
Madhya Pradesh1,03,3532,74,35319,40,35323,14,204
Maharashtra23,0002,35,8688,16,83818,66,661
Mizoram004201,155
Odisha03161,1871,500
Punjab005,34715,231
Puducherry002,8012,801
Rajasthan61661647,9181,72,527
Uttar Pradesh2,94,84523,06,80534,18,76572,81,790
Uttarakhand67,8652,63,7522,78,2292,78,229
Total7,38,83744,60,0991,04,94,2801,63,65,513

यापैकी गोवा राज्यात 6 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 6,72,466 प्रॉपर्टी कार्ड्स तयार करण्यात आली. महाराष्ट्रात आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये 23,000, आर्थिक वर्ष 2021-2022 मध्ये 2,35,868, आणि आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये 8,16,838, याप्रमाणे 6 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 18,66,661 प्रॉपर्टी कार्ड्स तयार करण्यात आली. स्वामित्व (SVAMITVA) योजनेंतर्गत राज्यांनी तयार केलेला मालमत्ता कार्डावरील राज्यवार आणि वर्षवार डेटा (विदा) पुढील प्रमाणे आहे.

States/UTsNumber of villages in which Drone Flying is completed
Andaman and Nicobar Islands186
Andhra Pradesh13,176
Arunachal Pradesh2,197
Assam900
Chhattisgarh13,079
Dadra and Nagar Haveli and Daman and Diu80
Delhi31
Goa410
Gujarat12,372
Haryana6,260
Himachal Pradesh10,735
Jammu and Kashmir4,053
Jharkhand240
Karnataka8,225
Kerala203
Ladakh232
Lakshadweep Islands10
Madhya Pradesh43,014
Maharashtra36,819
Manipur209
Mizoram215
Odisha2,435
Puducherry96
Punjab8,040
Rajasthan27,366
Sikkim1
Tamil Nadu3
Telangana5
Tripura1
Uttar Pradesh90,908
Uttarakhand7,441
Total2,88,942

मालमत्ता कार्ड तयार करताना ड्रोनच्या सहाय्याने पाहणी केली जाते. 6 डिसेंबर 2023 पर्यंत 2,88,942 गावांमध्ये ड्रोन उड्डाण पूर्ण झाले आहे. स्वामित्व (SVAMITVA) योजनेंतर्गत गोव्यामध्ये 410 आणि महाराष्ट्रात 36,819 प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आली.

6 डिसेंबर 2023पर्यंत, स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत एकूण रु. 354.52 कोटी जारी करण्यात आले.

स्वामित्व योजनेंतर्गत जारी करण्यात आलेल्या निधीची वर्षवार आकडेवारी पुढील प्रमाणे:

Financial YearAmount released
(in Rs.)
2020-2179.65 crores
2021-22139.99 crores
2022-23105.00 crores
2023-24 (as on 06.12.2023)29.88 crores
Total354.52 crores

स्वामित्व (SVAMITVA) योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वे/ चौकटी नुसार, ग्रामीण लोकसंख्या मालमत्ता डेटाच्या भविष्यातील कोणत्याही अद्ययावतीकरणासाठी आणि नियमीतपणे सर्वेक्षण आयोजित करण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल. राज्याच्या मालमत्तेचा डेटा आणि नकाशे भविष्यात अद्ययावत करण्याची यंत्रणा राज्य सरकार निश्चित करेल. राज्य महसूल विभागाच्या नियमित डेटा देखरेखीचा एक भाग म्हणून मालमत्तेशी संबंधित डेटाचे अद्ययावतीकरण केले जाईल. मालमत्तेचा डेटा अद्ययावत करण्याची जबाबदारी राज्याच्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आहे.

Continue reading

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ सर्वोत्कृष्ट!

महाराष्ट्रातील प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धांपैकी एक असलेल्या 'दाजीकाका गाडगीळ करंडक २०२५'चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. पी. एन. जी. ज्वेलर्स प्रस्तुत या स्पर्धेत राज्यभरातील १२१ एकांकिकांमधून निवडलेल्या अंतिम फेरीतल्या १६ सर्वोत्कृष्ट कलाकृतींनी दमदार सादरीकरण केले. या वर्षी चुरशीच्या लढतीत...
Skip to content