सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रमांतर्गत पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाला प्रोत्साहन देत आहे. आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, परकीय चलनाची बचत करणे, देशांतर्गत कृषी क्षेत्राला चालना देणे आणि संबंधित पर्यावरणीय लाभ, यासारखी अनेक उद्दिष्टे यामागे आहेत. त्यामुळे रु. 24,300 कोटी परकीय चलनाची बचत झाली असून, शेतकऱ्यांना रु. 19,300 कोटी मिळाले आहेत, परिणामी कृषी क्षेत्राला चालना मिळाली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

ईबीपी कार्यक्रमांतर्गत, सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) इथेनॉल पुरवठा वर्ष (ESY) 2022-23 दरम्यान इथेनॉल मिश्रणामुळे अंदाजे 509 कोटी लिटर पेट्रोलची बचत केली आहे.

ईबीपी अंतर्गत इथेनॉलचे उत्पादन वाढवण्यासाठी, सरकारने व्याज माफी योजने अंतर्गत एकूण 1212 प्रकल्पांना मंजुरी दिली असून, यामध्ये 590 मोलासेस आधारित, 474 धान्य-आधारित आणि 148 दुहेरी फीड आधारित प्रकल्पांचा समावेश आहे.