Homeचिट चॅटसीएंची ३७वी प्रादेशिक...

सीएंची ३७वी प्रादेशिक परिषद १५ डिसेंबरला मुंबईत!

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने येत्या १५ व १६ डिसेंबरला मुंबईतल्या गोरेगाव येथील नेस्को कॉम्प्लेक्समध्ये चार्टर्ड अकाऊंटंट्सच्या (सीए) बहुप्रतीक्षित ३७व्या प्रादेशिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अर्पित काबरा यांनी नमूद केले की, ही परिषद चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या क्षेत्रातील तेजस्वी विचारांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थी, व्यावसायिक आणि उद्योगतज्ज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण, नेटवर्किंग आणि सहयोगासाठी गतिशील वातावरण प्रदान करणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे.

या परिषदेत नेटवर्किंगच्या संधी आणि सहयोग यासारख्या विषयांवर चर्चा केली जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान एआय, इनोव्हेशन, व्हर्च्युअल रिअॅलिटी आणि ऑटोमेशनचा अनुभव, अमृत कालमधील सीए प्रोफेशन, अर्थव्यवस्थेतील वाढीचे उत्प्रेरक म्हणून महिला व्यावसायिकांची भूमिका यावरही या परिषदेत चर्चा होणार आहे. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए. अनिकेत सुनील तलाटी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष सीए. रणजीत कुमार अग्रवाल, आदी मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

Continue reading

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

"न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही," अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली. २०२१पासून प्रलंबित असलेल्या एका 'प्रथम अपिलावर' प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा...

‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षा १७ मे रोजी; २३ एप्रिलपासून नोंदणी!

देशातील प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतली जाणारी 'जेईई ॲडव्हान्स्ड २०२६' ही परीक्षा यंदा रविवार, १७ मे २०२६ रोजी होणार आहे. यावर्षी या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी रुरकीकडे सोपवण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत वेळापत्रक आणि माहितीपुस्तिका प्रसिद्ध करण्यात...

येत्या शनिवार/रविवारी पायात बेड्या घालून फिरवा कौलू!

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारागृहात स्वा. सावरकर तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी भोगलेल्या यातनांची जाणीव सर्वसामान्यांना व्हावी म्हणून मुंबईच्या स्वा. सावरकर स्मारकाने येत्या शनिवार आणि रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सर्वसामान्यांना पायात बेड्या घालून कौलू फिरवण्याची संधी उपलब्ध करून दिली...
Skip to content