Homeएनसर्कलनोकरी शोधणारे मुकेश...

नोकरी शोधणारे मुकेश झाले नोकरी देणारे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत विकसित भारत संकल्प यात्रेच्या (VBSY) लाभार्थींशी नुकताच संवाद साधला. त्यात कर्नाटकातील तुमकुर येथील गृहोपयोगी वस्तूंचे दुकान मालक आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे (VBSY) लाभार्थी मुकेश यांनी संवाद साधताना पंतप्रधानांना सांगितले की त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 4.5 लाख रुपयांचे, पीएम मुद्रा योजनेचे कर्ज मिळाले असून ते सध्या या दुकानात 3 लोकांना रोजगार देत आहेत. मुकेश हे नोकरी शोधणार्‍या व्यक्तीपासून नोकरी प्रदाता बनले आहेत.

लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत वेळेत पोहोचेल, याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजनांच्या उद्देशाची परिपूर्णता करण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात येत आहे.

मुकेश यांनी, त्यांना मुद्रा कर्ज आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार बँकांकडून मिळणाऱ्या कर्ज प्रक्रिया सुलभतेबद्दल माहिती देणाऱ्या एका प्रसारमाध्यम पोस्टबद्दल पंतप्रधानांना माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी मुकेश यांना आजच्या 50 टक्के डिजिटल व्यवहारांच्या तुलनेत, सर्व व्यवहार पूर्णपणे यूपीआय आणि डिजिटल पेमेंटमार्फत स्वीकारण्याची सूचना केली, कारण यामुळे बँकेकडून आणखी गुंतवणूक करण्यात मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, मुकेश हे भारतातील युवा वर्गाच्या लवचिकतेचे आणि दृढनिश्चयाचे उदाहरण आहेत, ज्यांना केवळ नोकऱ्यांचीच इच्छा नाही तर रोजगार निर्मितीचीही इच्छा आहे. देशातील तरुणांना पाठिंबा देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचाही पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content