Homeब्लॅक अँड व्हाईटचार बंदरसमुह मिळून...

चार बंदरसमुह मिळून पुढे होणार एक भव्य बंदर!

सहा बंदरसमुहांपैकी चार बंदरसमुह म्हणजे कोचीन – विझिंजम बंदरसमुह, गॅलेथिया साउथ बे बंदर, चेन्नई – कामराजर – कुड्डालोर बंदरसमुह, पारादीप तसेच वार्षिक 300 दशलक्ष टनांपेक्षा (एमटीपीए) जास्त क्षमता असलेले इतर कमी महत्त्वाचे बंदरसमुह तसेच 500 एमटीपीएपेक्षा जास्त क्षमतेचे इतर दोन बंदरसमुह म्हणजे दीनदयाल आणि टुना टेकरा बंदरसमुह, तसेच जवाहरलाल नेहरू – वाढवण बंदरसमुह, 2047पर्यंत भव्य बंदर म्हणून विकसित केले जाणार आहेत.

क्षमता वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रमुख बंदरांनी हाती घेतलेल्या उपक्रमांचा सागरी अमृतकाळ व्हिजन, 2047 मध्ये समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने आणि अंतर्गत संसाधनांद्वारे मुख्य बंदरांमधील पायाभूत सुविधा वाढवणे आणि क्षमता वाढवणे ही कामे आधीच प्रगतीपथावर आहेत.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 

Continue reading

मुंबई महापालिकेकडून ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर

मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ३१ हजार रुपयांपर्यंतचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी हा निर्णय घोषित केला. या सानुग्रह अनुदानाचा तपशील पुढीलप्रमाणेः १. महापालिका अधिकारी / कर्मचारीः रुपये ३१,०००/- २. अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळा...

काँग्रेस सेवादल सुरू करणार प्रत्येक गावात केंद्र

काँग्रेस सेवादल प्रत्येक गावात सेवादल केंद्राची स्थापना करणार आहे. मंगळवारी वसई-विरार जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिरात हा निर्णय घेण्यात आला. पहिल्या दिवशी सकाळी वसई विरार जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांच्या हस्ते ध्वजारोहण...

मंगोलियात जाणार सारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे पवित्र अवशेष

भारत आणि  मंगोलिया यांच्यातील संबंध केवळ राजनैतिक नाहीत. ते भावनिक आणि आध्यात्मिक बंध आहेत. अनेक शतकांपासून दोन्ही देश बौद्धतत्त्वाच्या सूत्रामध्ये बांधले गेले आहेत. या कारणामुळे आपल्याला आध्यात्मिक बंधू असेही संबोधले जाते. आज या परंपरेला अधिक दृढ करण्यासाठी आणि या...
Skip to content