Homeबॅक पेजविविध पुरस्कारांनी झाला...

विविध पुरस्कारांनी झाला महापारेषणचा गौरव

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकांचे वितरण ऑस्ट्रियाच्या दूतावासाचे व्यापार उपायुक्त बर्नर्ड ऍंडरसन यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया ऍन्ड पीआर, ब्रॅंडिंग, सर्वोत्कृष्ट फिल्म (इंग्रजी) व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान हा विशेष पुरस्कार मिळाला. महापारेषणचे संचालक (मनुष्यबळ विकास) सुगत गमरे व जनसंपर्क अधिकारी डॉ. मिलिंद आवताडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

महापारेषण

नवी दिल्लीतील डॉ. भीमराव आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय जनसंपर्क महोत्सवाच्या समारंभात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जागतिक बॅंकेचे वरिष्ठ ऊर्जा सल्लागार राजीव रंजन मिश्रा, इंडिया टुडेचे संचालक ध्रुबा ज्योती पती, पीआरएसआय`चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सचिव डॉ. पीएलके मूर्ती यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार (भा.प्र.से.) यांनी यशाचे संपूर्ण श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले. विशेषतः सोशल मीडियाव्दारे (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब, टेलिग्राम, थ्रेडस) जनसंपर्क विभागाने महापारेषणची भूमिका लोकांसमोर ठळकपणे मांडली. भविष्यातही, महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.

Continue reading

‘शिकार’च्या शूटिंगच्या वेळी दिग्दर्शक मच्छरदाणीत!

गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) काल एक आंतरसांस्कृतिक संवाद रंगला. 'शिकार', 'निलगिरीज: अ शेअर्ड वाईल्डरनेस' आणि 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी', या तीन चित्रपटांतल्या कलाकारांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. आपल्या चित्रपटातील समृद्ध आणि वैविधतेने गुंफलेल्या कथानकातील भावना, अंतर्दृष्टी...

कोरियाच्या जेवॉन किमनी जिंकली ‘इफ्फी’तल्या लोकांची मने!

गोव्यात काल भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) सुरूवात एका बंदिस्त सभागारात न होता चक्क रस्त्यांवर झाली. रस्त्यांवर उतरा. लय अनुभवा. कथा उलगडताना पाहा, अशा जिवंत, उत्साहपूर्ण वातावरणात या महोत्सवाला प्रारंभ झाला. आतापर्यंतच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रवासात प्रथमच, 'इफ्फी'ने पारंपरिक चार भिंती...

नंदुरबारमधल्या रानफुलांचा चहा प्या मुंबईत!

मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरांत रहाणाऱ्या नागरिकांना आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांची खाद्यसंस्कृती यांविषयी कायमच एक कुतूहल असते. जेव्हा ही संस्कृती अनुभवायला मिळते, तेव्हा तो शहरी नागरिकांसाठी एक विलक्षण अनुभव असतो. हाच विलक्षण अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे उद्या, २२ आणि रविवारी, २३ नोव्हेंबरला!...
Skip to content