Homeचिट चॅटनेक्सस सीवूड्सचा ब्लॅक...

नेक्सस सीवूड्सचा ब्लॅक फ्रायडे सेल सुरू!

भारतातील सर्वात मोठा रिटेल प्लॅटफॉर्म असलेल्या नेक्सस सिलेक्ट मॉल्स यांनी त्यांच्या खास ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नवी मुंबईचं आकर्षण असलेल्या नेक्सस सीवूड्स मॉलमध्येही हा सेल आज, शुक्रवार २४ नोव्हेंबर ते रविवार २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. या तीन दिवसांत वेगवेगळ्या आकर्षक ब्रँड्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट असेल.

सीवूड्स स्टेशनमध्येच असलेला नेक्सस सीवूड्स हा मॉल नवी मुंबईचं आकर्षण मानलं जातं. दिवाळी असो किंवा नवीन वर्षाचं स्वागत, ओणम् असो किंवा पोंगल आणि प्रजासत्ताकदिन असो किंवा स्वातंत्र्यदिन प्रत्येक सणासुदीच्या काळात नेक्सस सीवूड्सतर्फे आपल्या ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना आणि उपक्रम राबवण्यात येतात. ग्राहकांना खरेदीपलीकडे एक उत्तम अनुभव मिळावा, यासाठी नेक्सस सीवूड्स मॉल नेहमीच प्रयत्नशील असतो. या ब्लॅक फ्रायडे सेलदरम्यानही नेक्सस सीवूड्समधील ५०पेक्षा जास्त ब्रँड्सनी जवळपास ५० टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. तसंच नवी मुंबईकरांसाठी मॉल हे तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.

मुंबईत आता मस्त थंडी सुरू होईल. त्याआधी तुमचा वॉर्डरोब खास थंडीच्या कपड्यांसाठी तयार करायला हवा. त्याशिवाय नंतर येणारा नाताळ आणि नवीन वर्ष यासाठीही तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तींसाठी भेटवस्तू घ्यायच्या असतील, तरी ही उत्तम संधी आहे. अधिकाधिक ग्राहकांनी या सेलचा लाभ घ्यावा, असं आवाहन नेक्सस सीवूड्सच्या व्यवस्थापनाने केलं आहे.

Continue reading

‘पेड दर्शन’साठी मंदिरे, पैशांसाठी थाटलेली दुकाने आहेत का?

पैशांअभावी दर्शन नाकारले जाणे हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान आहे आणि संविधानाने दिलेल्या मूलभूत घटनात्मक धार्मिक अधिकारावर आणलेली गदा आहे. केवळ उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी मंदिर हे एखादे व्यावसायिक आस्थापन वा दुकान आहे का?, असा सवाल करत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक...

‘संगीत शांतीब्रह्म’ने जिंकली रसिक प्रेक्षकांची मने!

संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाची आठवण करून देणारा संगीतनाट्य महोत्सव मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच साजरा झाला. रसिकांच्या गर्दीने हा संगीतनाट्य महोत्सव विशेष रंगत गेला. ही संस्था गेली अनेक वर्षे संगीतनाटकांना पुनश्च वैभव प्राप्त करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजित करत...

शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी उन्हाळी शिबीर

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय मुलांसाठी विनाशुल्क कबड्डी स्पर्धात्मक प्रशिक्षण शिबीर मुंबई शहर व उपनगरमधील विविध विभागामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचा शुभारंभ कुर्ला-पश्चिम येथील गांधी मैदानात २५ एप्रिलपासून होणार आहे. नवोदित खेळाडूंना तंत्रशुध्द कबड्डी खेळाची...
Skip to content