Homeब्लॅक अँड व्हाईटइफ्फीत रंगला भारतीय...

इफ्फीत रंगला भारतीय माहितीपटांवर मास्टर क्लास!

गोव्यातल्या 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग म्हणून, काल गोव्यातील कला अकादमीमध्ये आयोजित कार्तिकी गोन्झाल्विस, आरव्ही रमाणी, मिरियम चंडी मेनाचेरी, साई अभिषेक आणि नीलोत्पल मजुमदार यांचे ‘जागतिक स्तरावर भारतीय माहितीपट’ यावर मास्टर क्लास सत्र आयोजित करण्यात आले होते.

निवेदक अंशुल चतुर्वेदी यांच्याशी माहितीपटांवरील चर्चेत, माहितीपट निर्मात्यांनी माहितीपटाच्या निर्मितीचे सार आणि आव्हाने यावर मार्गदर्शक आणि मौल्यवान विचार सामायिक केले. भारतीय माहितीपटांनी जागतिक स्तरावर ओळख मिळवली आहे, प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन आणि प्रशंसा मिळवली आहे.

प्रख्यात माहितीपट निर्माती कार्तिका गोन्साल्विस तिच्या उद्बोधक कथाकथन आणि विविध सांस्कृतिक परिदृश्यांची चाचपणी यासाठी ओळखली जाते. तिने सांगितले की, तथ्यावर आधारित कथा वास्तविकतेत त्यांचे सत्य शोधतात, शिकण्याच्या आणि परिवर्तनाच्या समृद्ध प्रवासाला चालना देतात. ‘‘माहितीपटांसाठी सहाय्यक व्यवस्थाना बळ देण्यात सहकार्य महत्त्वपूर्ण आहे” असे तिने सांगितले.

कलात्मकता आणि सामाजिक प्रासंगिकता मांडणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते आर.व्ही. रमाणी म्हणाले, ‘‘माहितीपट  निर्मितीचे प्राथमिक सार तथ्यात्मक कथांचे प्रामाणिक चित्रण करण्यात आहे आणि  यातून मिळणारा पैसा दुय्यम बाब आहे.’’

दिग्दर्शिका आणि निर्माती मिरियम चंडी मेनाचेरी आकर्षक माहितीपटांद्वारे न सांगितलेल्या कथा सांगण्यासाठी प्रसिद्ध असून  तिच्या प्रवासात त्याचे प्रतिबिंब उमटते असे तिने अधोरेखित केले. “माहितीपटाची आवड त्याची कथा सांगणाऱ्यांना प्रेरित करत असली, तरीही, वित्तपुरवठा आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मुख्य प्रवाहातील माध्यमांप्रमाणेच नवोदित निर्मात्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे, अशी वेगळी भूमिका मेनाचेरी यांनी मांडली.

प्रभावशाली सिनेमॅटिक कथनातून संस्कृती आणि समुदायांना एकत्र जोडणारा माहितीपट क्षेत्रातील आघाडीचा निर्माता साई अभिषेक यांनी भारताच्या आशावादी माहितीपट परिदृश्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “उत्साही प्रेक्षक आहेत, मात्र मुख्य प्रवाहातील सिनेमाशी तुलना करता येईल अशा मजबूत परिसंस्थेची कमतरता आहे. ‘फिल्म क्लब आणि डिस्ट्रिब्युशन चॅनेल यासारख्या सहाय्यक व्यवस्था महत्त्वपूर्ण आहेत यावर त्यांनी भर दिला.

सामाजिक बारकावे आणि मानवी अनुभवांच्या मार्मिक चित्रणासाठी ओळखले जाणारे माहितीपट निर्माते नीलोत्पल मुझुमदार म्हणाले की, “माहितीपट निर्मिती कथाकथनाला काल्पनिकतेपासून मुक्त करते, जीवनाशी संवाद साधते आणि सामायिक मानवी अनुभवांद्वारे जोडले जाण्याशी संबंधित आहे.

या प्रसंगी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील संचालक (चित्रपट) आर्मस्ट्राँग पेम यांनी स्पष्ट केले की, माहिती आणि प्रसारण मंत्रालय सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट, कोलकाता आणि  फिल्म अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे माहितीपट निर्मितीचा एक अल्प-मुदतीचा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. दूरदर्शनवर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या माहितीपटांबरोबच इतर माहितीपट दाखवण्यासाठी ठराविक वेळ देण्याची घोषणाही त्यांनी केली. पेम यांनी अधोरेखित केले की, चित्रपट निर्मिती आणि सहनिर्मितीसाठी एनएफडीसीच्या माध्यमातून इफ्फी फिल्म बाजारमध्ये यावर्षीपासून 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content