Wednesday, January 15, 2025
Homeन्यूज अँड व्ह्यूजसेवा खंडित करण्याच्या...

सेवा खंडित करण्याच्या धमक्या दूरसंचार विभाग देत नाही!

दूरसंचार विभाग ही भारतातील दूरसंचार क्षेत्रासाठी धोरणे, कार्यक्रम आणि नियामक आराखडा तयार करण्यासाठीची नोडल संस्था असून नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे, दूरसंचार विभाग संपूर्ण देशात विश्वसनीय आणि सुरक्षित संचार सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करते. दूरसंचार विभाग नागरिकांना सेवा खंडित करण्याची धमकी देणारे कॉल करत नाही, असे दूरसंचार विभागाने नुकतेच स्पष्ट केले आहे.

दूरसंचार विभागाकडून दोन तासांत मोबाईल क्रमांक खंडित केले जातील असा दावा करणाऱ्या आक्षेपार्ह कॉल्सबद्दल दूरसंचार विभागाने नागरिकांना दक्ष राहण्याचा सल्ला दिला आहे. अशा प्रकारचे कॉल हे व्यक्तींना फसवण्याचा आणि संभाव्य शोषण करण्याचा फसवा प्रयत्न आहे.

मुख्य माहिती:

  • दूरसंचार विभाग नागरिकांना सेवा खंडीत करण्याची धमकी देणारे कॉल करत नाही.
  • नागरिकांना असे कॉल आल्यास सावधगिरी बाळगावी आणि कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
  • दूरसंचार विभागाद्वारे सुचवलेली खबरदारी:
  • पडताळणी: जर तुम्हाला कॉल खंडीत करण्याची धमकी देणारा कॉल आला तर कोणतीही वैयक्तिक माहिती सामायिक करू नका. तुमच्या सेवा प्रदात्यांसोबत अशा कॉलची सत्यता पडताळून पहा.
  • दक्ष रहा : दूरसंचार विभाग दूरध्वनी कॉलद्वारे सेवा खंडीत करण्याचा इशारा देत नाही, हे लक्षात ठेवा, असा कोणताही कॉल संशयास्पद मानला पाहिजे.
  • घटना नोंदवा : राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टल https://cybercrime.gov.in  वर कोणत्याही संशयास्पद कॉलची तक्रार करा.

दक्ष राहणे, माहितीची पडताळणी करणे आणि कोणत्याही संशयास्पद घडामोडीची त्वरित तक्रार करणे यावर दूरसंचार विभाग भर देतो. या फसव्या कॉलच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि संभाव्य शोषणापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी विभाग कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या संस्थांसोबत काम करत आहे.

Continue reading

अजित घोष महिला क्रिकेटः भामा सी. सी. उपांत्य फेरीत

अंजू सिंगच्या स्फोटक शतकी खेळीच्या बळावर स्पॉन्सर्स इलेव्हनचा १३७ धावांनी पराभव करुन भामा सी.सी.ने सलग तिसऱ्या विजयासह ५व्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. अंजूने २० चौकार आणि ७ षटकारांची आतषबाजी केली. ज्यामुळे भामाला ४...

पंतप्रधान मोदींकडून युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाचवेळी राष्ट्राला समर्पित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मुंबईत भारतात तयार करण्यात आलेली निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे एकाचवेळी लोकार्पण केले. या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन,...

नव्या दमाच्या कलाकारांचा नवा कोरा चित्रपट ‘गौरीशंकर’!

"गौरीशंकर" चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजवर चित्रपटांतून प्रतिशोधाच्या वेगवेगळ्या कथा मांडल्या गेल्या आहेत. आता 'गौरीशंकर' या आगामी चित्रपटातून प्रतिशोधाची नवी कथा उलगडणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या...
Skip to content