Homeडेली पल्ससुलेखनकार अच्युत पालव...

सुलेखनकार अच्युत पालव यांना जीवनगौरव पुरस्कार

प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार सोहळा बनारस हिंदू विश्वविद्यालयात नुकताच संपन्न झाला. आयआयटी, आयडीसी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड आर्ट यांनी आयोजित केलेल्या ‘टायपो डे’ या आंतरराष्ट्रीय टायपोग्राफी सेमिनारमध्ये सुलेखनातील सेवेचा गौरव म्हणून अच्युत पालव यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आयडीसीचे प्रा. रवि पोवय्या, प्रा. श्रीकुमार, बीएचयुचे प्रा. मनीष अरोरा, अजंता सेन तसेच देशातील आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टायपोग्राफर आणि कॅलिग्राफर उपस्थित होते.

अच्युत पालव यांनी 1973 साली शिरोडकर हायस्कूलमध्ये चित्रकला शिक्षक परशुराम नाबर यांच्या मार्गदर्शनाखाली फलक लेखनाला सुरूवात केली. पुढे त्यांनी जेजे इन्स्टिटयूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये प्रवेश घेतला. एका लेक्चरदरम्यान त्यांची ज्येष्ठ सुलेखनकार र. कृ. जोशी यांची भेट झाली आणि पालवांची अक्षरांकडे पाहण्याची दृष्टी बदलून गेली. चौथ्या अन पाचव्या वर्षासाठी लेटरिंग टायपोग्राफी अन कॅलिग्राफी स्पेशल विषय घेऊन प्रथम वर्गात ते उत्तीर्ण झाले.

पुढे उल्का ऍडव्हर्टायझिंगची संशोधन करण्याकरीता असलेली शिष्यवृत्ती मिळाली. मोडी लिपीवर भाषातज्ज्ञ डॉ. अशोक केळकर, इतिहासतज्ज्ञ डॉ. ग. ह. खरे, ज्येष्ठ चित्रकार, इतिहासाचे अभ्यासक द. ग. गोडसे आणि र. कृ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 वर्षं अभ्यास करून ‘मोडी लिपी – 15 ते 18वे शतक’ असा प्रबंध त्यांनी सादर केला. देवनागरी आणि मोडी लिपी यांच्या समन्वयातून मुक्त लिपी निर्माण केली आणि महाराष्ट्र राज्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रसिद्ध केलेल्या “आपला महाराष्ट्र” या पुस्तकासाठी वापरली. याच दरम्यान आयआयटी, आयडीसी, पवई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये प्रात्याक्षिक करण्याची संधी मिळाली आणि पालवांच्या कामाने जगाचे लक्ष वेधून घेतले.

देवनागरी आणि मोडी लिपी शिकविण्याकरिता जर्मनी, लंडन आणि नेंदरलँडमधून आमंत्रण मिळाली आणि आज जगभर देवनागरीची पताका घेऊन ते फिरत आहेत. 3 महिन्यांपूर्वी 80 रशियन मुलांना त्यांनी देवनागरीचे धडे दिले. मॉस्कोसारख्या शहरात प्रदर्शन घडवून आणलं. 2007 साली काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा करून देशभरात सुलेखनाचं महत्त्व पटवून देण्यात पालवांचा मोठा हात आहे. कॅलिफेस्टसारखे भारतीय लिप्यांचे उत्सव त्यांनी सुरू केले आणि देशातील सुलेखनकारांना एकत्र आणले. भारत हा शेतीप्रधान देश असला तरी तो लिपीप्रधानदेखील आहे याची जाणीव आजच्या तरुण पिढीला करुन दिली. त्यामुळे देशातील लिपी आणि अक्षरसौंदर्य जगाला दिसेल. अच्युत पालव यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार तसेच मानसन्मान मिळाले असून जगातल्या बऱ्याच म्युझियमने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे.

Continue reading

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...

एमजेएससी कॅरम स्पर्धेत प्रसन्न गोळे अजिंक्य

मुंबईच्या माहीम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-एमजेएससी व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय शालेय मुलामुलींच्या एमजेएससी ट्रॉफी विनाशुल्क कॅरम स्पर्धेत पोद्दार अकॅडमी स्कूल-मालाडचा प्रसन्न गोळे विजेता ठरला. १०-९ अशी आघाडी घेणाऱ्या राष्ट्रीय ख्यातीचा सबज्युनियर कॅरमपटू प्रसन्न गोळेने न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरच्या आर्यन...

रविवारी आनंद घ्या राधिका जोशी यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १५ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता राधिका जोशी यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उस्ताद खादिम हुसैन खाँ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम होईल. यावेळी तबल्यावर प्रणव गुरव तर संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर...
Skip to content