Friday, October 18, 2024
Homeडेली पल्सटाटा एआयजीने लाँच केली 'एल्डर केअर...

टाटा एआयजीने लाँच केली ‘एल्डर केअर सेवा’!

टाटा एआयजी जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड ही भारतातील आघाडीची विमा कंपनी असून कंपनीने वयोवृद्धांसाठी टाटा एआयजी एल्डर केअर ही सर्वसमावेशक अशी आरोग्य विमा योजना लाँच केली. घरी सुसृषाह विविध आरोग्यसेवांचा यामध्ये समावेश आहे. वयाच्या ६१व्या वर्षांपासून पुढील वयाच्या प्रत्येकासाठी ही टाटा एआयजी एल्डर केअर योजना असून, त्यात वृद्धापकाळ तणावमुक्त, सहज आणि सुरक्षित जावा यासाठी काळजी घेतली जाणार आहे.

वृद्धांसाठी आरोग्य विमा हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यांना आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवून आरोग्यावर होणाऱ्या खर्चाचे व्यवस्थापन करण्यास आरोग्य विमा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. जसे वय वाढत जाते तसे आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते आणि वैद्यकीय खर्चही वाढण्याची जोखिमही जास्त असते. परिणामी वयोवृद्धांसाठी खास बनविलेली आरोग्य विमा असल्यास आर्थिक नियोजनात ती महत्त्वाची घटक ठरते. वाढत चाललेला वैद्यकीय खर्चाचा प्रश्न लक्षात घेता वरिष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय खर्चानंतरही सेवा देणारी एल्डर केअर ही विमा योजना टाटा एआयजीने आणली आहे. हे वरिष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणारे विमा कवच आहे.

वरिष्ठ नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाच्या पलिकडे जाऊन टाटा एआयजीने एल्डर केअर ही विमा योजना खास तयार केली आहे. टाटा एआयजी एल्डर केअरमध्ये केवळ आरोग्य सेवेच्या कवचावर भर दिलेला नाही तर काय काळजी घ्यावी हे सांगणारी यंत्रणाही तयार केली आहे. याशिवाय क्लेम नसतानाही या पॉलिसीमध्ये खास गोष्टींसाठी वार्षिक आरोग्य सल्ला देण्याचीही सोय आहे. कठीण काळात घरी त्यांची काळजी घेण्याची आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचीही गरज असते. या पॉलिसीमध्ये घरी आरोग्य सेवाही मिळते आणि प्रोफेशनल आरोग्य व्यवस्थापकांच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांना सहाय्यही दिले जाते.

ज्या सुवर्ण काळात वरिष्ठ नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याची आणि त्यांच्या सदृढ असण्याची काळजी घेण्याची गरज असते तेव्हा त्यांना विमा योजना कामी येते, याची हमी टाटा एआयजी काय देत आली आहे. या विश्वासाची एक परंपरा आहे.

टाटा एआयजी जनरल इन्श्युरन्स कं. लि.चे एमडी आणि सीईओ नीलेश गर्ग म्हणाले की, काळजी आणि सुरक्षा या मार्गावरून जात असताना आम्ही टाटा एआयजी एल्डर केअर ही महत्वाची विमा योजना सुरू करत असल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यातून आमची वरिष्ठ  नागरिकांप्रती असलेली कटिबद्धता सिद्ध होते. कणव, नाविण्यता आणि एकत्रित विमा कवच अशा सर्वांचे मिश्रण असलेल्या या पॉलिसीमध्ये वरिष्ठ नागरिकांना त्यांच्या सुवर्ण काळात त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाण्याची हमी मिळते. त्यांच्या आरोग्याच्या आणि सुखाची काळजी घेण्याचा विश्वास या टाटा एआयजी एल्डर केअरमधून अधोरेखीत होते.

टाटा एआयजी एल्डर केअर इतर विमा योजनांपेक्षा वेगळी आहे. त्यात पुढी अनेक गोष्टींचा समावेश आहे. ज्यांचा वरिष्ठ नागरिकांना मोठा फायदा होतो.

  • होम नर्सिंग सेवा : ज्याचा विमा काढलेला आहे अशा व्यक्तिला पोस्ट ऑपरेटिव्ह केअरचा भाग म्हणून सात दिवसांपर्यंत दर वर्षी घरी नर्सिंगची सेवा मिळते.
  • खास हेल्थ मॅनेजर : विमा काढलेल्या व्यक्तिसाठी खास आरोग्य व्यवस्थापक असतो. त्याला लागणाऱ्या विविध सेवांसंबंधी तो समन्वयाचे काम करतो. त्यामुळे त्या वरिष्ठ नागरिकाची अविरत पोस्ट ऑपरेटिव्ह काळजी घेतली जाते.
  • घरी फिजिओथेरपी : जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी, स्ट्रोक, पॅरालिसिस अशा आजारांनतर विमाधारकाला १० सत्रांसाठी घरी फिजिओथेरपीची सेवा मिळते.
  • आरोग्य सेवा : आमच्या ग्राहक अॅपच्या माध्यमातून विमाधारकाला टेली कन्सल्टेशन्स, डाएट आणि न्यूट्रिशन कन्सल्टेशन्स आणि चाचण्या, औषधी, वैद्यकीय उपकरणे, हेल्थ सप्लिमेंट्स आणि आरोग्य सेवांवर सवलतीही मिळतात. औषधी घरपोच हवी असतील तर त्यांच्या मागणीनुसार त्यांना घरी औषधीही उपलब्ध करून दिली जातात.

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content