Homeचिट चॅटपोर्टेबिलिटी नियमांवरील टिप्पण्यांसाठी...

पोर्टेबिलिटी नियमांवरील टिप्पण्यांसाठी ‘ट्राय’ने मुदत वाढवली!

‘ट्राय’ म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने 27.09.2023 रोजी दूरसंचार मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (नववी सुधारणा) नियमन, 2023 मसुदा जारी केला. या  मसुदा नियमनांवर संबंधितांकडून लेखी टिप्पण्या प्राप्त करण्याची अंतिम तारीख 25.10.2023 ही निश्चित करण्यात आली होती. मात्र टिप्पण्या सादर करण्यासाठी मुदत वाढवण्याची उद्योग संघटनेची विनंती लक्षात घेऊन, लेखी टिप्पण्या सादर करण्याची अंतिम मुदत दि.  08.11.2023पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टिप्पण्या, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना) अखिलेश कुमार त्रिवेदी यांच्याकडे शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात advmn@trai.gov.in. वर पाठवाव्यात. कोणतेही  स्पष्टीकरण/माहिती, यासाठी अखिलेश कुमार त्रिवेदी, सल्लागार (नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि परवाना), ट्राय यांच्याशी दूरध्वनी क्रमांक +91-11-23210481 वर संपर्क साधता येऊ शकेल.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content