Homeमुंबई स्पेशलडिसेंबरमध्ये मुंबईत रंगणार...

डिसेंबरमध्ये मुंबईत रंगणार पारंपरिक खेळांच्या स्पर्धा!

देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रीडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून काटेकोरपणे करावे, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.

देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, मालाडचे उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, क्रीडा भारतीचे श्रीकांत धर्माधिकारी, डॉ.उत्तम केंद्रे, सदस्य गणेश विचारे तसेच विविध देशी मैदानी क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले, आपले पारंपरिक क्रीडा प्रकार लुप्त होवू नयेत यासाठी अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव केले जावेत, अशी मागणी वारंवार केली जाते. ही मागणी पाहता डिसेंबर महिन्यात खो-खो, दंड बैठक, मल्लखांब, लंगडी, विटी-दांडू, लगोरी, अखाडा कुस्ती, मानवी मनोरा (पिरॅमिड), रस्सी खेच, दोरी उडी, सूर्यनमस्कार, पावनखिंड दौड, शरीरसौष्ठव, तलवारबाजी, ढाल तलवार आदी मैदानी खेळांचा समावेश करुन पंधरा दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे नियेाजन करण्यात येणार आहे.

क्रीडा महोत्सवास संपूर्ण सहकार्य केले जाईल. या महोत्सवा दरम्यान खेळाडूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन काटेकोरपणे करावे अशा सूचना पालकमंत्री लोढा यांनी यावेळी केल्या.

Continue reading

१ ऑगस्टला रूपेरी पडद्यावर झळकणार ‘मुंबई लोकल’!

मुंबई शहराची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल आणि त्यात फुलणारी एक प्रेमकहाणी आता 'मुंबई लोकल' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची जोडी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार असून येत्या १ ऑगस्टला हा...

57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला पहिल्यांदा भेट देणार भारतीय पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात तब्बल 57 वर्षांनंतर अर्जेंटिनाला तसेच गेल्या 60 वर्षांत ब्राझिलला भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील. 2 ते 9 जुलै 2025 असा पंतप्रधानांचा हा दौरा आहे. या कालावधीत ते घाना,...

विधिमंडळात आजही गदारोळ?

विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंडाला स्पर्श करत निदर्शने केल्यामुळे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारच्या संपूर्ण दिवसभराच्या कामकाजासाठी सभागृहातून निलंबित केले. विधिमंडळात आजही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून कृषीमंत्र्यांच्या कथित वादग्रस्त विधानांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता...
Skip to content