Homeबॅक पेजमहाराष्ट्र-गोव्यातल्या खाण कामगारांच्या...

महाराष्ट्र-गोव्यातल्या खाण कामगारांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीत वाढ!

शैक्षणिक वर्ष 2023-24साठी शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत, महाराष्ट्र आणि गोवा राज्य आणि दादरा, नगर हवेली आणि दमण या केंद्रशासित प्रदेशातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणारे बीडी / चुनखडी आणि डोलोमाईट / लोह/ मॅंगनीज / क्रोम खनिज क्षेत्रात काम करणाऱ्या खाण कामगारांच्या शिक्षण घेणाऱ्या मुला/मुलींसाठी आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नियमांनुसार इयत्ता 1 पासून उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती / गणवेशाची रक्कम वाढवण्यात आली आहे, अशी माहिती कामगार कल्याण कल्याण विभाग नागपूर कार्यालयाचे कल्याण आयुक्त, डब्ल्यू. टी. थॉमस यांनी दिली आहे.

इयत्ता 1 ते 4 साठी 1,000 रुपये, इयत्ता 5 ते 8 साठी 1,500 रुपये, इयत्ता 9 वी ते 10 साठी 2,000 रुपये, इयत्ता 11 ते 12 साठी रुपये 3,000 आणि औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था, तंत्रनिकेतन आणि बीएससी कृषीसह पदवी अभ्यासक्रमांसाठी वार्षिक अर्थसहाय्य 6,000 रुपये आणि अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन यांसारख्या व्यावसायिक अ‍भ्यासक्रमांसाठी 25,000 रुपये वार्षिक अर्थसहाय्य वाढवण्यात आले आहे.

योजनेंतर्गत लाभ मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल scholarships.gov.in वर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 (प्री-मॅट्रिकसाठी) आणि 31 डिसेंबर 2023 (पोस्ट-मॅट्रिकसाठी) अशी निश्चित करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती/ अटी आणि पात्रता राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर ऑनलाइन प्रदर्शित केली आहे. ऑनलाइन अर्जासोबत जोडली जाणारी कागदपत्रे वाचनीय असली पाहिजेत. अर्ज केल्यानंतर अर्जदार शिकत असलेल्या शैक्षणिक संस्थेशी संपर्क साधून अर्जाची पडताळणी करून घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असेल.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, इतर कोणत्याही समस्या/ निराकरणासाठी, नागपूर मुख्यालय दूरध्वनी क्रमांक 0712-2510200 आणि 071-2510474 वर किंवा wcngp-labour[at]nic[dot]in या ईमेलवर संपर्क साधता येईल. तसेच, कामगार कल्याण संस्थेद्वारे चालवल्या जाणार्‍या जवळच्या दवाखान्याचे/ रुग्णालयांचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी/ डॉक्टर यांच्याकडून वैयक्तिक माहिती मिळवता येते. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज आणि संस्थेने सत्यापित न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content