Homeचिट चॅटपद्म पुरस्कार-2024साठी नामांकन...

पद्म पुरस्कार-2024साठी नामांकन करा 15 सप्टेंबरपर्यंत!

प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर करण्यात येणार्‍या पद्म पुरस्कार 2024साठी ऑनलाईन नामांकने/ शिफारशी, करण्यासाठीचे पोर्टल, दिनांक 1 मे 2023 रोजी पासून सुरू झालेले असून, यावर्षी पद्म पुरस्कारांसाठी नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे. या पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर (https://awards.gov.in) ऑनलाइन पद्धतीने स्वीकारणे सुरू आहे.

पद्म पुरस्कार- पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहेत. 1954 मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी यांसारख्या सर्व क्षेत्रांत/विषयांमध्ये विशिष्ट आणि असाधारण कामगिरी/सेवा करून ‘वैशिष्ट्यपूर्ण कार्य’ करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. सेवा, व्यापार आणि उद्योग या क्षेत्रांत वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेद न करता महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र असतात.

पद्म

डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांमधून काम करणारे सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

पद्म पुरस्कारांचे रूपांतर “जन पद्म पुरस्कार” मध्ये करण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे. म्हणून सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी स्वतःच्या नावासह त्या व्यक्तींसाठी नामांकने/शिफारशी कराव्यात. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणार्‍या प्रतिभावान व्यक्तींची ओळख करून देण्यासाठी सर्व नागरीक एकत्रित प्रयत्न करू शकतात.

https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर उपलब्ध असलेल्या स्वरुपात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशीलांसह (वर्णनात्मक स्वरूपात जास्तीत जास्त 800 शब्दांमध्ये) ही नामांकने/ शिफारशी केल्या जाव्यात तसेच, त्यांची सुस्पष्टपणे वैशिष्ट्यपूर्ण आणि असाधारण कामगिरी समोर आणून त्यांच्या सेवेसंबंधीत क्षेत्रात/प्रकारात शिफारस केलेली असावी. या संदर्भातील सर्व तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर https://padmaawards.gov.in ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहेत.

या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content