Homeचिट चॅटमनीष देसाई PIB...

मनीष देसाई PIB चे नवे प्रधान महासंचालक!

पत्र सूचना कार्यालयाचे (PIB) प्रधान महासंचालक म्हणून मनीष देसाई यांनी नुकताच पदभार स्वीकारला. राजेश मल्होत्रा या पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर मनिष देसाई यांनी त्यांचा पदभार स्वीकारला आहे.

मनिष देसाई 1989च्या तुकडीमधील भारतीय माहिती सेवा अधिकारी आहेत. यापूर्वी देसाई यांनी केंद्रीय संचार ब्युरोचे प्रधान महासंचालक म्हणून सरकारी जाहिराती आणि आऊटरीच उपक्रमांचे काम पाहिले आहे.

सुमारे तीन दशकांच्या उल्लेखनीय कारकिर्दीमध्ये देसाई यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. यामध्ये चित्रपट प्रभागाचे महासंचालक, आयआयएमसीचे अतिरिक्त महासंचालक (प्रशासन आणि प्रशिक्षण), सीबीएफसीचे सीईओ यांचा समावेश आहे.

चित्रपट प्रभागातील त्यांच्या कार्यकाळादरम्यान मुंबईत राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय उभारण्याच्या कामामध्ये त्यांचा सहभाग होता.

त्यांनी एक दशकाहून जास्त काळ पीआयबी मुंबईमध्येही अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यम उपक्रमांची आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी), गोवा या महोत्सवासह अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांची हाताळणी केली.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content