Homeचिट चॅट'अक्षरधन' या ई-चारोळी...

‘अक्षरधन’ या ई-चारोळी संग्रहाचे प्रकाशन

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, उत्तर मुंबई विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पुस्तक दिनाचे औचित्य साधून ‘अक्षरधन’ या प्रातिनिधिक ई-चारोळी संग्रहाचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. अ.भा.म.सा.प.चे राष्टीय कार्याध्यक्ष शरद गोरे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष फुलचंद नागटिळक, कोकण प्रदेशाध्यक्ष डॉ. अ. ना. रसनकुटे व मुंबई प्रदेश अध्यक्षा हिरकणी राजश्री बोहरा यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. 

सदर कार्यक्रम हा ऑनलाईन स्वरुपात संपन्न झाला असला तरी जवळपास 200 जण यात सहभागी झाले होते. उत्तर मुंबई विभागाच्या अध्यक्षा गीतांजली वाणी यांनी सुंदर प्रस्तावना व आभार प्रदर्शन केले. कार्याध्यक्ष विठ्ठल घाडी यांनी पुस्तकाची सुंदर व आकर्षक रचना व ग्राफिक्स तयार केले. उपाध्यक्षा योगिता तकतराव यांनी तांत्रिक बाबी सांभाळत सर्व नियोजनानुसार कार्यक्रमास सहकार्य केले. सचिव कल्पना पाटकर व सरचिटणीस राखी जोशी यांनी सुंदर शब्दातून सूत्रसंचालन केले. शरद गोरे यांनी  शुभेच्छा व मार्गदर्शन दिले. डॉ. रसनकुटे यांनी शुभेच्छा दिल्या. राजश्री बोहरा यांनीही मनोगत व्यक्त केले.

या बहारदार कार्यक्रमास जान्हवी कुंभारकर- नवी मुंबई जिल्हाध्यक्षा, सुलभा पवार- राहता तालुकाध्यक्षा, संगीता बांबोळे- अध्यक्षा विदर्भ महिला आघाडी, अनिता गुजर- अध्यक्षा डोंबिवली शहर, अश्विनी मेंगाणे- पन्हाळा तालुकाध्यक्षा, सविता काळे- उपाध्यक्षा विक्रोळी शहर, कुलदीप रुघे- आंबड तालुकाध्यक्ष, नेहा तलाठी- उपाध्यक्षा महाड तालुका, सारीका चव्हाण- अध्यक्षा भांडूप शहर, तसेच  आजीवन सदस्या हर्षदा गुळमिरे, यश घोडे, कांचन नेवे, चंद्कला जोशी, मंजू वणवे, उषा राऊत,  आप्पा तरे इ. सर्व ऑनलाईन स्वरुपातून उपस्थित होते. 

पीडीएफ स्वरुपात या पुस्तकाचे अनावरण करुन सर्वत्र ते पाठवण्यात आले. 

स्वत:बद्दलचे वर्णन चारोळीत करुन नाविन्यपूर्ण उपक्रम व्हॉट्सअच्या माध्यमातून बहारदार स्वरुपाचा साजरा आला. साहित्यक्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धा, संकल्पना राबवत, आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ जुळवत या कार्यक्रमाला सौंदर्य प्रप्त झाले.  बाहेरील परिस्थिती कितीही भयावह असली तरी त्यावरील भाष्य व चर्चा न  करता गोड आठवणींना स्मरून लेखन करत असताना मनावरील ताण तणाव कमी होत आहेत. ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक सबंध साहित्य क्षेत्रातून आवर्जून होत आहे. एकूण 105 चारोळ्यांनी बहरलेला हा चारोळी संग्रह वाचकांच्या पसंतीला नक्कीच खरा उतरणार आहे.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content