Homeचिट चॅटराज्य अधिस्वीकृती समितीच्या...

राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी यदु जोशी, मुंबईत दीपक कैतके

राज्य अधिस्वीकृती समिती – २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कालच मुंबई विभागीय अधिस्वीकृती समितीचीही बैठक झाली. त्यात ज्येष्ठ पत्रकार दीपक कैतके यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

राज्य अधिस्वीकृती समितीच्या सर्व म्हणजे २७ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. मतमोजणीत जोशी यांना १९, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विनोद जगदाळे यांना ८ मते मिळाली. मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. मुंबई विभागीय समितीच्या निवडणुकीत दीपक कैतके आणि त्यांचे प्रतिस्पर्धी दीपक भातुसे यांना समान मते मिळाली. त्यानंतर ईश्वरी चिठ्टीने कैतके यांच्या बाजून कौल दिला.

यदु जोशी तीन दशकांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. ते दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे सहसंपादक आहेत. यापूर्वीही त्यांनी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. याशिवाय त्यांनी नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे दोन वेळेस अध्यक्षपद आणि महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. दीपक कैतके पत्रकारितेबरोबरच मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई विभागाचे सचिव आहेत. अडचणीत सापडलेल्या रूग्णांची निस्पृह आरोग्यसेवा करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.

आजच्या बैठकीस माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, संचालक (माहिती-प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती- वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content