Homeचिट चॅटआता पेटीएमवर मिळणार...

आता पेटीएमवर मिळणार मराठी भाषेत पेमेंट अलर्ट्स!

पेटीएम, या भारतातील आघाडीच्‍या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्‍यूआर, साऊंडबॉक्‍स व मोबाइल पेमेंट्सच्‍या अग्रणी कंपनीने भारताच्‍या कानाकोपऱ्यामध्‍ये डिजिटल व्‍यवहार उपलब्‍ध करून देत इन-स्‍टोअर पेमेंट्समधील लीडर म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ केले आहे. पेटीएमचे साऊंडबॉक्‍स नाविन्‍यपूर्ण ऑडिओ डिवाईस आहे, जे व्‍यापाऱ्यांना पेटीएम क्‍यूआरच्‍या माध्‍यमातून मिळालेल्‍या प्रत्‍येक पेमेंटसाठी वॉईस नोटिफिकेशन्‍ससह मदत करते. आता पेटीएमने व्यापाऱ्यांकरिता मराठी भाषेत पेमेंट अलर्ट्स मिळण्‍याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  

सध्‍या डिवाईसमध्‍ये मराठीसह १० भाषा उपलब्ध आहेत. त्यामध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कानडी, मल्‍याळम, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि ओरिया या भाषांचा समावेश आहे. हे डिवाईस व्‍यापाऱ्यांना पेमेंट्सवर देखरेख ठेवण्‍यास आणि चुकीचे व्‍यवहार व ग्राहकांकडून होऊ शकणाऱ्या फसवणुकीला प्रतिबंध करण्‍यास मदत करते.

पेटीएम

इन-स्‍टोअर पेमेंट्समधील आपले नेतृत्त्‍व अधिक दृढ करत पेटीएमने नुकतेच व्‍यापाऱ्यांसाठी दोन नवीन डिवाईसेस – पेटीएम पॉकेट साऊंडबॉक्‍स आणि पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स लाँच केले. त्यामधून लहान दुकानांसाठी तंत्रज्ञानाचे नेतृत्त्‍व केले गेले आहे. मेड इन इंडिया पेटीएम ऑल-इन-वन पॉकेट साऊंडबॉक्‍स नेहमी व्‍यस्‍त असलेल्‍या व्‍यापाऱ्यांसाठी अनोखा डिवाईस आहे. आणखी एक स्‍वदेशी डिवाईस पेटीएम म्‍युझिक साऊंडबॉक्‍स व्‍यवसायाला मनोरंजनाची जोड देतो.

पेटीएम साऊंडबॉक्‍स कशाप्रकारे ऑर्डर करावा?

· पेटीएम फॉर बिझनेस अॅप उघडा आणि साऊंडबॉक्‍स विभागामध्‍ये जा. 

· नवीन डिवाईस पर्यायाचा शोध घ्‍या आणि त्‍यावर क्लिक करा. 

· विनंती अर्ज भरा आणि योग्‍य उत्‍पादन व्‍हर्जनसाठी ऑर्डर करा. 

· साऊंडबॉक्‍स तुम्‍हाला घरपोच डिलिव्‍हर केला जाईल.

पेटीएम साऊंडबॉक्‍स कशाप्रकारे ऑपरेट करावा?

· डिवाईसच्‍या डाव्‍या बाजूवरील रबरी हॅच खुला करत बॉक्‍ससह मिळालेले सिम इन्‍सर्ट करा. 

· लाइट इंडिकेटर लाल व निळे करण्‍यासाठी पॉवर बटन प्रेस करून ठेवा. 

· डिवाईस पेमेंट्स स्‍वीकारण्‍यासाठी कार्यान्वित होईल. 

· मदतीसाठी सोबत दिलेल्‍या मॅन्‍युअलमधील अॅक्टिवेशनबाबतच्‍या सूचनांचे पालन करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या ‘मेक इन इंडिया’ दृष्टीकोनाला पुढे घेऊन जात पेटीएमचा साऊंडबॉक्‍स १०० टक्‍के स्‍वदेशी उत्‍पादित करण्‍यात आलेले उत्‍पादन आहे. पेटीएमच्‍या पेमेंट सोल्‍यूशन्‍ससह साऊंडबॉक्‍सच्‍या व्‍यापक अवलंबतेने पेटीएमला भारतातील मोबाइल पेमेंट्सशी संलग्‍न केले आहे.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content