Homeचिट चॅटपेटीएमचे फ्रीडम ट्रॅव्हल...

पेटीएमचे फ्रीडम ट्रॅव्हल कार्निव्हल: तिकिटांवर घ्या सवलती!

पेमेंट्स आणि वित्तीय सेवा पुरवणाऱ्या व क्‍यूआर व मोबाइल पेमेटंसचा पाया रचणाऱ्या पेटीएम या भारताच्या अग्रगण्य ब्रॅण्डची मालक कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने पेटीएम फ्रीडम ट्रॅव्हल कार्निव्हलची घोषणा केली आहे. १० ऑगस्ट पर्यंत चालणा-या या कार्निव्हलमध्ये यूजर्सना स्वातंत्र्यदिनाच्या मोठ्या वीकेंडमध्ये पेटीएम अॅपच्या मध्यमातून विमान, ट्रेन आणि बस तिकिट्सच्या बुकिंगवर आकर्षक सवलती मिळणार आहेत. 

पेटीएम कडून आरबीएल बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या ऑफर्सच्या माध्यमातून डोमेस्टिक फ्लाइट्सच्या तिकिटांवर फ्लॅट १५ टक्क्यांची तर आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सच्या तिकिटांवर फ्लॅट १० टक्क्यांची झटपट सूट दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त कंपनीकडून पेटीएम वॉलेट आणि पेटीएम पोस्टपेडच्या माध्यमातून केलेल्या डोमेस्टिक फ्लाइट्सच्या बुकिंगवर फ्लॅट १२ टक्‍के सवलतही दिली जाणार आहे. या योजनेत इंडिगो, विस्तारा, स्पाइसजेट, एअरएशिया, आकासा एअर आणि एअर इंडिया या सर्व प्रमुख विमानकंपन्यांचा सहभाग असल्याने यूजर्सना तिकिटांच्या बुकिंगवर अधिकाधिक बचत करता येणार आहे. कंपनीद्वारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सशस्त्र बलांतील कर्मचाऱ्यांनाही विशेष दरात प्रवासभाडे दिले जात आहे. अधिक बचत करण्यासाठी यूजर्स झीरो कन्व्हिनिएन्स शुल्कासह आपले विमानतिकिट बुक करू शकणार आहेत. 

बस तिकिटांसाठी पेटीएम कडून २५ टक्‍के झटपट सवलत दिली जात आहे, ज्यासाठी ‘क्रेझी सेल’ (CRAZYSALE) हा कोड वापरायचा आहे व विशिष्ट ऑपरेटर्सच्या तिकिटांवर २० टक्‍के अतिरिक्त सवलतही मिळणार आहे. पेटीएमच्या बेस्ट प्राइम गॅरंटीज योजनेअंतर्गत २,५०० हून अधिक बस ऑपरेटर्सच्या बस तिकिटांवर सर्वात स्वस्त तिकिटदरांची हमी कंपनी देत आहे. 

यूपीआय पेमेंटद्वारे केलेल्या ट्रेन तिकिटांच्या बुकिंगवर पेटीएम कडून शून्य शुल्क आकारले जात आहे. पेटीएम अॅपवर यूजर्सना आपल्या बुकिंगचा PNR स्टेटस तपासता येतो, ट्रेन्सचे लाइव्ह ट्रॅकिंग करता येते आणि ट्रेनप्रवासाशी संबंधित सर्व चौकशांसाठी २४X७ ग्राहकसेवा उपलब्ध असते. 

याखेरीज विमान, बस आणि ट्रेन तिकिट कोणतेही कारण न देता रद्द करण्याची ‘मोफत कॅन्सलेशन’ची सोयही पेटीएम द्वारे दिली जात आहे, ज्यामुळे तिकिट रद्द करताना कॅन्सलेशनपोटी कोणतेही छुपे शुल्क भरावे न लागता तिकिटाची १०० टक्‍के रक्कम यूजर्सच्या मूळ खात्यात जमा होऊ शकणार आहे. ‘मोफत कॅन्सलेशन’ अंतर्गत कंपनीने यूजर्सच्या हाती किमान प्रिमियम भरण्याची सोय दिली आहे. प्रवासाचा बेत पूर्णपणे निश्चित नसेल तर तिकिटांचे बुकिंग करताना यूजर्स ही सेवा निवडू शकतात. 

पेटीएमद्वारे पेमेंटच्या माध्यमांचे लवचिक पर्याय पुरविले जातात, त्यामुळे यूजर्सना पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, नेटबँकिंग, डेबिट कार्डस् आणि क्रेडिंट कार्डस् यांच्याद्वारे तिकिटांचे पैसे भरता येतात. प्रवासाच्या बुकिंग्जसाठी या कंपनीच्या सेवेला यूजर्सकडून प्राधान्य दिले जाते आणि ही कंपनी इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनची अधिस्वीकृत ट्रॅव्हल एजंट आहे. कंपनीद्वारे मोफत कॅन्सलेशन, रिफंड्स आणि प्रवास विम्यासह विनाअडथळा प्रवास अनुभव पुरविला जातो.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content