Homeचिट चॅटमहाराष्ट्र आणि गोवा...

महाराष्ट्र आणि गोवा टपाल विभागाची पेन्शन अदालत 29 सप्टेंबरला!

मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्यावतीने टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंबनिवृत्तवेतनधारकांसाठी 53वी पेन्शन अदालत दिनांक 29-09-2023 रोजी 11.00 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई -400001 येथे आयोजित केली आहे. 

निवृत्तिवेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांची सेवेत असताना मृत्यु झालेली आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्तिवेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.

पेन्शन अदालतमध्ये पूर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे, ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेन्शन, टीबीओपी / एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी च्या  पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. 

निवृत्तिवेतनधारक खाली दिलेल्या प्रपत्रामध्ये आपल्या अर्जाच्या तीन प्रती, लेखा अधिकारी, अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दूसरा मजला, मुंबई – 400 001 ला 25-08-2023 रोजी किंवा तत्पूर्वी वैयक्तिकरित्या (सामुहिक / इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकता. 25-08-2023 च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.

भारतीय डाक विभाग – डाक पेन्शन अदालतच्या अर्जाचा फॉर्म

क्र.विषयव्यक्ती / निवृत्तिवेतनधारक यांनी भरायचे तपशील
1.निवृत्ती / मृत्युच्यावेळी पदनामसह निवृत्तिधारकाचे / कुटुंब निवृत्तिधारकाचे नाव 
2.कार्यालयाचे नाव जिथून निवृत्त झाले आहेत आणि निवृत्तीची तारीख 
3पीपीओ क्रमांक 
4पोस्टऑफिस आणि डिवीजनचे नाव जिथे पेन्शन घेतली जात आहे. 
5निवृत्तिवेतनधारकाचा पोस्टाचा पत्ता दूरध्वनी सोबत. 
6थोडक्यात तक्रार (जर आवश्यकता असेल तर तपशीलासह अर्ज जोडा.) 
7व्यक्ती / निवृत्तिवेतनधारकांची सही आणि दिनांक 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content