Homeचिट चॅटINS सह्याद्री आणि...

INS सह्याद्री आणि कोलकाता पापुआ न्यू गिनी येथे दाखल!

पापुआ न्यू गिनीसोबत सागरी भागीदारी आणि सहकार्य वाढवण्यासाठी पूर्व हिंद महासागर प्रदेशात तैनात असलेली भारतीय नौदलाची सह्याद्री आणि कोलकाता ही जहाजे, बुधवारी पोर्ट मोरेस्बी येथे पोहोचली आहेत.

या बंदरावरील थांब्यादरम्यान, दोन्ही जहाजांचे कर्मचारी पापुआ न्यू गिनी संरक्षण दलातील कर्मचार्‍यांसह व्यावसायिक संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण, योग सत्र आणि जहाज भेटी यासह विविध उपक्रमांमध्ये व्यग्र राहतील. सागरी क्षेत्रात भारत आणि पापुआ न्यू गिनी या देशांतील संबंध मजबूत करणे हा या बंदर भेटीचा मुख्य उद्देश आहे.

आयएनएस सह्याद्री हे स्वदेशी बनावटीची रचना आणि बांधणी असलेले प्रोजेक्ट-17 क्लास मल्टीरोल स्टेल्थ फ्रिगेट्स प्रकारचे तिसरे जहाज आहे आणि त्याचे नेतृत्व कॅप्टन राजन कपूर करतात. आयएनएस कोलकाता हे स्वदेशी बनावटीची रचना आणि बांधणी असलेले प्रोजेक्ट-15A वर्गातील डिस्ट्रॉयर प्रकारातील पहिले जहाज आहे आणि त्याचे नेतृत्व कॅप्टन शरद सिन्सुनवाल करत आहेत. दोन्ही जहाजे माझगाव डॉक लिमिटेड, मुंबई येथे बांधली गेली आहेत आणि आधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सने सज्ज आहेत जी जमीन, आकाश आणि जल या तिन्ही आयामातून निर्माण होणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत.

Continue reading

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....
Skip to content