मुंबईतल्या गोरेगाव पश्चिमेला मोतीलाल नगर परिसरात भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संदीप पटेल यांच्या प्रयत्नांनी कोविड लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. गुरूवारी या लसीकरण केंद्राचे उद्घाटन भाजपाच्या स्थानिक आमदार विद्या जयप्रकाश ठाकूर यांच्या हस्ते झाले. मुंबई महापालिकेचे माजी उपमहापौर दिलीप पटेल, नगरसेवक संदीप पटेल, नगरसेविका श्रीकला पिल्ले आदी यावेळी उपस्थित होते.

मोतीलाल नगरमधल्या हावरे इंद्रप्रस्थ इमारतीतील मोतीलाल नगर हेल्थ पोस्ट येथे हे लसीकरण केंद्र सुरू झाले आहे. दररोज सकाळी साडेनऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे केंद्र सुरू राहणार आहे. आसपासच्या परिसरातल्या सर्व पात्र व्यक्तींनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक संदीप पटेल यांनी केले आहे.

