Homeचिट चॅटसु.शि. कादंबरी लेखन...

सु.शि. कादंबरी लेखन स्पर्धेचा निकाल घोषित!

सुप्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांच्या स्मरणार्थ (त्यांच्या २०व्या स्मरणदिनानिमित्त आणि ७५व्या जन्मदिनानिमित्त) आयोजित केलेल्या सु.शि. कादंबरी लेखन स्पर्धेत रवींद्र भयवाल लिखित ‘’मिशन गोल्डन कॅट्स’’, या कादंबरीची निवड परीक्षकांनी विजेती कादंबरी म्हणून केली आहे. या स्पर्धेत एकूण २१ लेखक सहभागी झाले होते.

लेखक रवींद्र भयवाल यांचे सुहास शिरवळकर परिवार, स्टोरीटेल इंडिया व परीक्षकांतर्फे अभिनंदन करण्यात आले असून सर्व सहभागी लेखकांनी केलेल्या प्रयत्नांसाठी व सहकार्यासाठी त्यांना धन्यवाद व शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून, प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी, हृषीकेश गुप्ते तसेच स्टोरीटेल इंडियाचे भारताचे प्रमुख योगेश दशरथ यांनी काम पाहिले. या कामात सुहास शिरवळकर यांच्या साहित्याचे अभ्यासक, अजिंक्य विश्वास व सुधांशू अंबिये यांनी त्यांना सहाय्य केले.

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content