शिवसेनेचे जोगेश्वरी पूर्वचे आमदार रविंद्र दत्ताराम वायकर यांच्या मातोश्री पार्वती दत्ताराम वायकर यांचे आज अल्पशः आजाराने मुंबईतल्या निवासस्थानी निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८६ वर्षांच्या होत्या.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लिली व्हाईट, बी विंग 806 येथे ठेवण्यात आला आहे. दुपारी जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर जोगेश्वरी पूर्वच्या प्रतापनगर येथील राजेश्वर रागिनवार हिंदू स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.

