Homeचिट चॅटउद्या चुकवू नये...

उद्या चुकवू नये असे काही…

उद्या शुक्रवार, ३० जून २०२३ रोजी सायं. ७ ते ८.३० zoom आणि facebookवर… केवळ कुतुहलापोटी ध्यास घेऊन, उन्हातान्हात सिंधुदूर्गातील कातळसडे तुडवून कातळशिल्पांचा अश्मयुगीन पुरातन वारसा जगासमोर आणणारे, या विषयावरील एकमेव संदर्भग्रंथाचे लेखक सतीश लळीत आणि इतिहास, पुरातत्त्व आणि पर्यावरण विषयांच्या अभ्यासक, पुरातत्त्वशास्त्रज्ञ साईली पलांडे-दातार यांच्याशी मनमोकळ्या गप्पा… ‘भवताल कट्ट्या’वर…

भवताल कट्टा ५८

विषय: कातळशिल्पांचे गूढ विश्व

कोकणात अनेक सड्यांवर असंख्य कातळशिल्पं कोरलेली आहेत. नवनवी शिल्पं उजेडात येत आहेत, तसे त्यांच्याबद्दलचे गूढ वाढतच आहे. त्यांचे निर्माते, त्यांचा काळ, त्यांचा अर्थ, त्यांचे नेमके प्रयोजन असे कितीतरी प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचा उलगडा करणारा हा कट्टा…

सहभाग: सतीश लळीत (कातळशिल्प अभ्यासक / ‘घुंगुरकाठी’ संस्थेचे संस्थापक), साईली पलांडे-दातार (इतिहास, पुरातत्त्व आणि पर्यावरण विषयांच्या अभ्यासक)

वेळः शुक्रवार, ३० जून २०२३, सायं. ७ ते ८.३०

सहभागासाठी:

झूम लिंक- http://bitly.ws/JIAM

Meeting ID: 893 9400 5438

Passcode: 273379

किंवा

भवताल फेसबुक पेजवर लाईव्ह.

पेजची लिंक- https://facebook.com/bhavatal

संपर्कासाठी: bhavatal@gmail.com

Continue reading

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता केंद्राच्या सभागृहात तबला वादन स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन वयोगटात घेतली जाईल. (छोटा वयोगट १० ते १५ वर्षे आणि मोठा वयोगट १६ ते २५...

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...
Skip to content