Homeचिट चॅटप्रलंबित अर्जांसाठी करा...

प्रलंबित अर्जांसाठी करा २० जूनपर्यंत ऑफलाईन अर्ज

मुंबई उपनगर जिल्ह्यातील सन २०१८-१९ ते सन २०२१-२२ या वर्षात ज्या इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती/फ्रिशीप योजनेअंतर्गत अर्ज केले होते, त्यांचे या योजनेंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयास दि. २० जून २०२३ पर्यंत  सादर करावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

महाडिबीटी प्रणालीवर अर्ज नोंदणी करताना येणाऱ्या विविध अडचणींमुळे (महाविद्यालय बदल , शिक्षणात खंड इ), अर्ज ऑटो रिजेक्ट होणे या कारणामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला नाही. तरी या विद्यार्थ्यांनी वेळेत ऑफलाईन अर्ज महाविद्यालयात जमा करावयाचे असून ते अर्ज मुंबई उपनगर अधिनस्त सर्व महाविद्यालयांनी दि.२२ जून २०२३ पर्यंत  सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर, मुंबई-४०००७१ कार्यालयाकडे करावयाचे आहेत, असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण  प्रसाद खैरनार यांनी कळविले आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content