Friday, February 7, 2025
Homeचिट चॅटमहावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर

महावितरणच्या मानव संसाधन संचालकपदी अरविंद भादीकर

महावितरणचे संचालक (मानव संसाधन) म्हणून अरविंद भादीकर यांची सरळसेवा भरतीद्वारे निवड झाली आहे. त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी अरविंद भादीकर कार्यकारी संचालक वितरण आणि मानव संसाधन (प्रभारी) म्हणून कार्यरत होते व त्यांनी या दोन्ही पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला आहे.

अमरावती येथील मूळचे रहिवासी असलेले भादीकर अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. ई. झाले आहेत.  मार्च-१९९२ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे कनिष्ठ अभियंता म्हणून ते रुजू झाले. खडका येथील ४०० किव्हो उपकेंद्रात सहाय्यक अभियंता व उपकार्यकारी अभियंता म्हणूनही त्यांनी काम केले. २००५मध्ये वाशीम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच मुख्यालयातील पायाभूत आराखडा,  नागपूर ग्रामीण मंडल व अमरावती मंडल येथे अधीक्षक अभियंता आणि अकोला व चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून ते कार्यरत होते.

महावितरणच्या संचालक (वाणिज्य)पदी योगेश गडकरी

दरम्यान, महावितरणचे संचालक (वाणिज्य) म्हणून योगेश गडकरी यांची सरळसेवा भरतीद्वारेनिवड झाली आहे. नुकताच त्यांनी या पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी गडकरी कार्यकारी संचालक (देयके व महसूल) म्हणून कार्यरत होते. नागपूर येथील मूळचे रहिवासी असलेले योगेश गडकरी यांनी अमरावती येथून अभियांत्रिकी  महाविद्यालयातून बी. ई. (कॉम्पूटर इंजिनिअरिंग) केले आहे. एप्रिल १९९४मध्ये तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून ते वर्धा येथे रुजू झाले. त्यांनी मुंबई मुख्यालयात विविध पदावर काम केले आहे. त्यांची पदोन्नतीद्वारे कार्यकारी संचालक (देयके व महसूल) या पदावर नियुक्ती करण्यात आली. गडकरी यांचा वीज क्षेत्रातील अतिशय अभ्यासू अधिकारी म्हणून लौकीक आहे. तसेच त्यांनी महावितरणच्या केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले असून त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या. त्याचप्रमाणे महावितरणच्या महसुलात वाढ झाली आहे.

Continue reading

‘छबी’तून उलगडणार अनोखी छबी!

प्रत्येक फोटोमागे एक गोष्ट असते तशी प्रत्येक फोटोग्राफरचीही एक गोष्ट असते. अशाच फोटोग्राफरची रंजक गोष्ट "छबी" या चित्रपटातून उलगडणार आहे. अद्वैत मसूरकर दिग्दर्शित, तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २५ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल...

वस‌ईच्या सूर्योदय आरबीएल स्कूलला विजेतेपद

मुंबईतल्या ए डब्ल्यू एम एच महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या स्पेशल चाईल्ड स्कूलच्या मुलांच्या क्रिकेटच्या अंतिम सामन्यात‌ वसई येथील सूर्योदय आरबीएल स्कूल मतिमंद मुलांच्या शाळेच्या संघाने विजेतेपद मिळविले. गोरेगाव येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात‌ सूर्योदय आरबीएल स्कूलने मुंबई उपनगर...

वरळीत कोटक कुटुंबाने 202 कोटींत खरेदी केले 12 फ्लॅट्स!

कोटक महिंद्रा बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उदय कोटक यांनी मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्रात अलीकडील सर्वात मोठी व्यक्तिगत खरेदी केली आहे. त्यांनी वरळीत तब्बल 200 कोटींहून अधिक रक्कम मोजून फ्लॅट्स खरेदी केले आहेत. शिव सागर नावाच्या तीन मजली...
Skip to content