Homeचिट चॅटवर्सोवाकरांच्या स्वागताने भारावले...

वर्सोवाकरांच्या स्वागताने भारावले केंद्रीय मंत्री पियुष गोयल! 

मुंबईतल्या वर्सोवा कोळीवाड्यात आलेल्या पाहुण्यांचे परंपरागत स्वागत करण्याची वर्सोवाकरांची परंपरा आहे. वर्सोवा कोळीवाड्यामध्ये केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, वस्त्रोद्योग, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दुपारी हिंगळादेवीचे दर्शन घेतले.

मुंबईमध्ये लोकसभा प्रवास करत असताना त्यांनी वर्सोवा कोळीवाड्याला भेट दिली. यावेळी वर्सोव्याच्या स्थानिक आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी त्यांचे शाल, श्रीफळ, तुळस व खास कोळी बांधवांची टोपी घालून स्वागत केले. यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

येथील वर्सोवा बसस्टॉप समोरील मसानदेवी मंदिरापासून वर्सोवाकरांची ग्रामदैवत असलेल्या पुरातन हिंगळादेवीच्या मंदिरापर्यंत कोळी नृत्य करत आणि बँड वाजवत कोळी बांधवांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर कोळी बांधव उपस्थित होते. वर्सोवाकरांच्या स्वागताने आणि आगत्याने तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल भारावून गेले. हिंगळादेवी मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली व तिथून परत मिरवणूक काढत मसानदेवीच्या मंदिरात येऊन येथील कोळी बांधवांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी कोळी बांधवांनी त्यांना आपल्या प्रश्नांची निवेदने त्यांना दिली. यावेळी माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर, माजी नगरसेविका रंजना पाटील, मुरजी पटेल, भाजपाचे मंडल अध्यक्ष पंकज भावे आदी मान्यवर उपस्थित होते.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content