Homeचिट चॅटक्यूएमएस एमएएसच्या ब्रॅण्ड...

क्यूएमएस एमएएसच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी कपिल देव!

क्यूएमएस एमएएस (मेडिकल अलाईड सर्विसेस) या हेल्थकेअर व वेलनेसच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीने पूर्व कसोटी क्रिकेटपटू कपिल देव यांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे.

त्यांचा हा सहयोग अधिक पुढे नेताना कंपनीने त्यांचे मेडिकल डायग्नोस्टिक डिवाईस क्यू-डिवाईसेसच्या लॉन्चसाठी त्यांची नवीन जाहिरात ‘क्यू डिवाईसेस: यू कॅन काऊंट ऑन देम’देखील लॉन्च केली आहे. २८ वर्षांहून अधिक काळाचा वारसा पुढे घेऊन जात ब्रॅण्ड क्षेत्रातील सर्वात विश्वसनीय कंपन्यांमध्ये ही कंपनी समाविष्ट आहे. ते त्यांच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर निवडीमधूनदेखील दिसून आले आहे. कंपनी ग्राहकांकरिता हेल्थकेअरला चालना देण्यासाठी सानुकूल वैज्ञानिक सहाय्य देते. त्यांची उत्पादने पूर्णत: मेड इन इंडिया आहेत आणि सहकारी नागरिकांना आरोग्यदायी व आनंदी जीवन जगण्यास मदत करण्याचे ध्येय आहे.

क्यूएमएस एमएएसच्या सहसंस्थापक डॉ. गुड्डी मखिजा म्हणाल्या की, कंपनी म्हणून आम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये ग्राहकांच्या स्वास्थ्याला अधिक प्राधान्य देतो. विश्वसनीयता, सेवा, दर्जात्मक हमी व नवोन्मेष्कार ही क्यूएमएस एमएएसची मुलभूत मूल्ये आहेत आणि कपिल देव हे या मूल्यांचे मूर्त रूप आहेत. त्यामुळे ते आमची पहिली निवड होते. आम्हाला आमच्या ग्राहकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे. आम्ही आरोग्य व स्वास्थ्याला अधिक महत्त्व देतो म्हणून आम्हाला सर्वांशी जोडली जाऊ शकेल, अशा आदर्श व्यक्तीसोबत असण्याची गरज होती. कपिल देव यांचा प्रेमळपणा व आत्मविश्वासामुळे ग्राहक त्यांच्याशी जोडले जातील. ब्रॅण्ड म्हणून आमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आाहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद आणण्याचे आमचे ध्येय संपादित करण्यामध्ये ते आम्हाला साह्य करतील.

कपिल देव म्हणाले की, देशातील सध्याच्या स्थितीमुळे पुन्हा एकदा आरोग्यसेवा विभागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जीवनशैलीसंबंधित आजारांमध्ये वाढ होत आहे आणि भारत जगातील मधुमेहाची राजधानी बनण्याच्या टप्प्यावर आहे. आपण आपल्या आरोग्याची बारकाईने देखरेख करण्याची गरज आहे आणि क्यूएमएस एमएएस ही बाब सक्षम करण्यासाठी सुलभपणे सर्वात प्रगत हेल्थकेअर उपकरण उपलब्ध करून देते. कंपनी ग्राहकांच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते आणि त्यांचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असणे हा सन्मान आहे. मी दीर्घकालीन व लाभदायी सहयोगासाठी उत्सुक आहे.

Continue reading

‘एआय’ची कमाल; रोगांना रोखण्यासाठी मिळणार रामबाण इलाज!

भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या साथीच्या आजाराला (पॅन्डेमिक) रोखण्यासाठी शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठाच्या संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील पहिली 'युनिव्हर्सल' (सार्वत्रिक) लस तयार केली आहे. विशेष म्हणजे, या लसीचा मुख्य घटक पूर्णपणे एआयद्वारे...

सामान्य आणि तत्काळ अर्जदारांसाठी पुण्यात विशेष पासपोर्ट मोहीम

नागरिकांना पासपोर्टसाठी लवकर नियोजित वेळ मिळावी तसंच, तातडीने  प्रवास करण्याची निकड असलेल्या नागरिकांसाठी, पासपोर्ट उपलब्द व्हावा म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने काही उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, 'सामान्य' आणि 'तत्काळ' श्रेणीतील अर्जदारांसाठी पुण्यातल्या 'प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयामार्फत, एका विशेष पासपोर्ट...

15 जूनपासून घाऊक किंमत निर्देशांकाचे आधारभूत वर्ष 2022-23!

घाऊक किंमत निर्देशांकासाठी आधीचे 2011–12 हे आधारभूत वर्ष बदलून 2022–23 हे सुधारित आधारभूत वर्ष म्हणून ग्राह्य धरायला तसेच उत्पादक मूल्य निर्देशांकांचे संकलन करायला नुकत्याच झालेल्या सक्षम अधिकाऱ्यांच्या बैठकीत, मंजुरी देण्यात आली. केंद्रीय उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार विभागाच्या अखत्यारीतले...
Skip to content