Homeचिट चॅटगुढीपाडव्याला श्री सिद्धिविनायकाच्या...

गुढीपाडव्याला श्री सिद्धिविनायकाच्या अलंकारांचा लिलाव

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे येत्या बुधवारी, म्हणजेच 22 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी पाच, यावेळी श्री चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव केला जाणार आहे.

या अलंकारांमध्ये श्री गणेश प्रतिमा, लॉकेट्स, मोदक, अंगठ्या, साखळ्या, हार आदींचा समावेश आहे. लिलावासाठी उपलब्ध असलेले अलंकार लिलावाच्या दिवशी मंदिराच्या आवारात प्रदर्शनार्थ ठेवण्यात येतील. लिलावाची प्रक्रिया पूर्णपणे राज्य शासनाच्या नियमांप्रमाणे होईल.  लिलावासंबंधीचे सर्वाधिकार न्यासाने राखून ठेवलेले आहेत. श्री सिद्धिविनायकाच्या भक्तांनी या लिलावात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन न्यास व्यवस्थापन समितीने केले आहे.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content