Homeटॉप स्टोरीराज्यातील २२ हजार...

राज्यातील २२ हजार महसूल कर्मचारी बेमुदत संपावर

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार आजपासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. बेमुदत संपाचा आजचा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर संप १००% यशस्वी झाल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष हेमंत साळवी यांनी केला आहे.

राज्यातील जवळपास २२००० वर्ग ३ व वर्ग ४चे कर्मचारी संप करत असून त्यामुळे महसूल कार्यालयातील सेवा ठप्प झाल्या आहेत. बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने या संपास पाठिंबा दिला आहे. शासनाने वेळीच लक्ष घालून महसूल संघटनेस तातडीने चर्चेसाठी बोलवावे असे आवाहन बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी केले आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सुरूवातीला काळ्या फिती लावून काम करण्याचे आंदोलन केले. त्यानंतर भोजन अवकाशात निदर्शने, एक दिवसाचे कामबंद आंदोलन, असे सर्व मार्ग निरूपयोगी ठरल्यानंतर आजपासून आम्ही बेमुदत संप पुकारल्याचेही साळवी यांनी सांगितले.

महसूल सहायकांची रिक्तपदे तातडीने भरणे, अव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्याने तसेच इतर १४ प्रमुख मागण्याकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

मनोरा बॅडमिंटनः विहा, अद्विक, केशवी, सयुज्व‌, सहाना, आयांश विजेते

मुंबईतल्या किंग सर्कल येथील नॉर्थ इंडियन असोसिएशनच्या बॅडमिंटन कोर्टवर आयोजित करण्यात आलेल्या मनोरा बॅडमिंटन अकादमीच्या स्पर्धेत विहा झालबा, अद्विक तिवारी, केशवी महेश्वरी, सयुज्व रजपूत, सहाना प्रभुगावकर, आयांश जैन, सहज कदम यांनी आपापल्या वयोगटात विजेतेपदाचा मान मिळवला. सहाना प्रभुगावकरने स्पर्धेत...

.. आणि रविदादांनी पुसले चिल्ड्रेन होममधल्या मुलांचे ओघळणारे अश्रू

तुम्हाला आठवतो का अभिनेत्ता संजीव कुमार आणि हे गीत...! 'आया रे खिलौनेवाला, खेल खिलौने लेके आया रे.."! आया रे! तुम कहा... गये हो... मेरे प्यारो... असाच एक अनुभव दिवाळी २०२६ फराळच्या निमित्ताने आला. त्या सुपरहिट बचपन चित्रपटात संजीव कुमार...

ईक्षा देसाईंचे वयाच्या आठव्या वर्षींचे स्वप्न साकार! झाल्या ‘मिसेस इंडिया’!!

मुंबईतल्या अशोकवन, दहिसर (पूर्व) येथील मानसशास्त्रज्ञ ईक्षा देसाई यांनी वयाच्या आठव्या वर्षी पाहिलेले स्वप्न अखेर सत्यात उतरवले आहे. द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट 'मिसेस इंडिया विजेती २०२६' म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबासह समाजात आनंदाची लाट उसळली आहे. यासोबतच...
Skip to content