केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर दरसालप्रमाणे यंदाही, येत्या मंगळवार, दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६-३० वाजता रमा प्रकाशनाने यूट्यूबवर येत्या मंगळवार, दि. २ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ६-३० वाजता रमा प्रकाशनाने यूट्यूबवर ‘केंद्रीय अर्थसंकल्प (२०२१ ) विश्लेषण’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
उद्या म्हणजेच दि. १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२१-२२चा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करणार आहेत. कोरोना महासाथीच्या अभूतपूर्व संकटाने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा आघात केला आहे. ती सावरण्यासाठी, पूर्वी कधीही सादर झाला नव्हता असा वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्प आपण मांडणार असल्याचे सीतारामन यांनीच जाहीर केल्याने या अर्थसंकल्पाबाबत प्रचंड कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित फडणीस, उदय तारदाळकर आणि श्रीकांत कुवळेकर यांनी केलेले अर्थसंकल्पाचे विश्लेषण निश्चितच उद्बोधक ठरेल. जास्तीतजास्त जणांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन रमा प्रकाशनाचे संचालक, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी यांनी केले आहे.
यूट्यूब लिंक: https://www.youtube.com/watch?v=xjkfZkJOAhQ