Skip to content
Friday, January 10, 2025
HomeUncategorizedनिवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात...

निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात 904 उमेदवार टांगणीवर

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सातव्या तसेच अखेरच्या टप्प्यात 1 जून 2024 रोजी 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघात मतदान होत असून त्यात 904 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.

8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 57 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण 2105 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या सर्व 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये सातव्या टप्प्यासाठी उमेदवारीअर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 मे 2024 होती. दाखल केलेल्या सर्व उमेदवारीअर्जांची छाननी केल्यानंतर, 954 उमेदवारी अर्ज वैध असल्याचे आढळले. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर 904 उमेदवार रिंगणात राहिले.

उमेदवार

सातव्या टप्प्यात, पंजाबमध्ये 13 लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक 598 उमेदवारीअर्ज आले होते. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये 13 लोकसभा मतदारसंघातून 495 उमेदवारीअर्ज आले होते. बिहारमधील 36 (त्यात जेहानाबाद लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 73) उमेदवारीअर्ज प्राप्त झाले. त्याखालोखाल पंजाबमधील 7 (लुधियाना लोकसभा मतदारसंघात 70) उमेदवारीअर्ज दाखल झाले. सातव्या टप्प्यासाठी लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांची सरासरी संख्या 16 आहे.

सातव्या टप्प्यासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार तपशीलवार माहिती

Sl. No.State/UTNumber of PCs in 7th PhaseNomination forms receivedValid candidates after scrutinyAfter withdrawal, final Contesting Candidates 
 
1Bihar8372138134 
2Chandigarh1332019 
3Himachal Pradesh4804037 
4Jharkhand31535552 
5Odisha61596966 
6Punjab13598353328 
7Uttar Pradesh13495150144 
8West Bengal9215129124 
 Total572105954904

Continue reading

नागपूरमध्ये उद्यापासून ‘ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा’!

नागपूरच्या सिव्हिल लाईन येथील केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील दक्षिणमध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे दरवर्षी आयोजित केला जाणारा 'ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळा आणि लोकनृत्य सोहळा' उद्यापासून 19 जानेवारीदरम्यान आयोजित केला जाणार आहे. या दहादिवसीय मेळ्यामध्ये विविध राज्यांची लोकनृत्यं, हस्तशिल्पप्रदर्शन त्याचप्रमाणे व्यंजनांची...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लंडनमध्ये!

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला बिर्ला यांनी काल लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भारत संविधान स्वीकारल्याची 75 वर्षे साजरी करत आहे. भारतीय राज्यघटनेने देशात परिवर्तनात्मक सामाजिक-आर्थिक बदल घडवून...

‘मुक्काम पोस्ट..’च्या निमित्ताने पूजाचे स्वामी समर्थांना पत्र

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पत्र लिहिणं दुर्मिळ झालं आहे. मात्र, पत्र लिहिणं हे अतिशय भावनिक असतं. अभिनेत्री पूजा सावंतनं स्वामी समर्थांना पत्र लिहून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' या चित्रपटाच्या निमित्तानं पूजानं स्वहस्ते पत्रलेखन...