Saturday, October 26, 2024
Homeहेल्थ इज वेल्थदेशातल्या 85% कुटुंबांना...

देशातल्या 85% कुटुंबांना घरगुती उपचारपद्धतीची माहिती

भारतातल्या ग्रामीण भागातील सुमारे 85% कुटुंबांमधील तर शहरी भागातील सुमारे 86% कुटुंबांमधील किमान एका सदस्याला तरी औषधी वनस्पती / घरगुती उपचारपद्धती / स्थानिक आरोग्यविषयक परंपरा / पारंपरिक औषधोपचार पद्धतींविषयीची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जुलै 2022 ते जून 2023, या काळात आयुष संदर्भातल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष नुकतेच जारी केले आहेत. याचा तपशील असा-

मुख्य निष्कर्ष

  • ग्रामीण भागातील सुमारे 95% तर शहरी भागातील सुमारे 96% नागरिकांना आयुषविषयीची माहिती आहे.
  • ग्रामीण भागातील सुमारे 85% कुटुंबांमधील तर शहरी भागातील सुमारे 86% कुटुंबांमधील किमान एका सदस्याला औषधी वनस्पती / घरगुती उपचार पद्धती / स्थानिक आरोग्यविषयक परंपरा / पारंपरिक औषधोपचार पद्धतींविषयीची माहिती आहे.
  • मागील 365 दिवसांमध्ये ग्रामीण भागातील सुमारे46% आणि शहरी भागातील सुमारे 53% व्यक्तींनी आजार प्रतिबंधासाठी तसेच उपचारांसाठी आयुषअंतर्गच्या उपचारपद्धतींचा वापर केला आहे.
  • ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत आयुर्वेद ही सर्वात जास्त उपयोगात आणली जाणारी उपचारपद्धती आहे.
  • साधारणतः शारिरिक व्याधी नुकसानीनंतर प्रकृती पूर्ववत होण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून आयुष उपचारपद्धती प्रामुख्याने वापरली जात आहे.
घरगुती

सर्वेक्षणाविषयी

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या वतीने सर्वेक्षणाच्या 79 व्या फेरीचा भाग म्हणून यंदा पहिल्यांदाच आयुषवरील पहिलेच विशेष अखिल भारतीय सर्वेक्षण केले गेले. जुलै 2022 ते जून 2023 या कालावधीत हे सर्वेक्षण पार पडले. या सर्वेक्षणाअंतर्गत अंदमान आणि निकोबार बेटांवरील काही अति दुर्गम गावे वगळता संपूर्ण भारतीय संघराज्य क्षेत्रात  सर्वेक्षणाची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यासाठी ग्रामीण भागातील 1 लाख 4 हजार 195 आणि शहरी भागातील 77 हजार 103 अशा एकूण 1 लाख 81 हजार 298 कुटुंबांकडून माहिती संकलित केली गेली.

यासाठी केले गेले सर्वेक्षण-

  • पारंपारिक आरोग्य सेवा पद्धतींबद्दल (आयुष औषध पद्धती) नागरिकांमधली जागरुकता
  • आजारांना प्रतिबंध तसेच आजारांवरील उपचारांसाठी आयुष उपचारपद्धतींचा प्रत्यक्ष उपयोग
  • देशभरातील कुटुंबांमध्ये घरगुती उपचारपद्धती, औषधी वनस्पती, स्थानिक आरोग्यविषयक परंपरा / पारंपरिक औषधे याविषयी असलेली जागरुकता

याशिवाय या सर्वेक्षणाअंतर्गत आयुष औषधोपचार पद्धतीचा वापर करण्यासाठी कुटुंबाला येणाऱ्या खर्चाविषयीची माहितीही या सर्वेक्षणाअंतर्गत संकलित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल आणि निष्कर्ष (वस्तुस्थिती मांडणाऱ्या दस्तऐवजांसह एकक पातळीवरील माहिती) सांख्यिकी मंत्रालयाच्या www.mospi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content