Thursday, October 24, 2024
Homeकल्चर +'मिफ्फ'च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी...

‘मिफ्फ’च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी 77 चित्रपटांची निवड

नुकत्याच सुरू झालेल्या 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (मिफ्फ) राष्ट्रीय स्पर्धेसाठी आलेल्या 840 प्रवेशिकांपैकी अत्यंत कलात्मक मांडणीने निर्मिती केलेल्या 77 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत निवडलेले चित्रपट 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत भारतीय नागरिकांनी भारतातच निर्मिती केलेले चित्रपट आहेत.

यंदा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 15 जून 2024 रोजी सुरुवात झाली असून तो 21 जून 2024पर्यंत रंगणार आहे. यंदाचा हा महोत्सव भारतीय चित्रपटसृष्टीच्या भविष्याचा वेध घेणारा महोत्सव आहे. यंदा राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत निवड झालेल्या चित्रपटांमध्ये नवोदित दिग्दर्शकांचे उल्लेखनीय 30 चित्रपट आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 12 चित्रपट कलाकृतींनीही स्थान मिळवले आहे.

राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत निवड झालेल्या चित्रपटांची संपूर्ण यादी खालील लिंकवर मिळेल.

https://miff.in/wp-content/uploads/2024/06/National-Competition-MIFF-2024.pdf

राष्ट्रीय स्पर्धेअंतर्गत विविध तीन गटांमधील चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

  • राष्ट्रीय माहितीपट स्पर्धा: या विभागात चित्रपट रसिकांना विचारमग्न करणाऱ्या 30 माहितीपटांची निवड करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय स्पर्धा: लघुकथा आणि अॅनिमेशन : या गटात निवड झालेल्या, लघुकथेच्या स्वरुपात आणि अॅनिमेशन माध्यमाचा वापर करून निर्मिती केलेले 41 चित्रपट चित्रपट रसिकांना कोणतीही कथा प्रभाविपणे सांगण्याच्या कसब आणि कौशल्याची साक्ष देणारे आहेत.
  • राष्ट्रीय स्पर्धा:  इंडिया इन अमृत काल: या संकल्पनाधारीत विषयावर निर्मित, देशाच्या भवितव्याचा वेध घेतल्याचा अनुभव देणारे सहा विशेष चित्रपट या गटात स्पर्धेसाठी निवडले आहेत.

या सर्व गटांमधील स्पर्धांसाठी दिले जाणारे प्रतिष्ठेचे पुरस्कार असे-

पुरस्कारांचे स्वरुप :

राष्ट्रीय स्पर्धा पुरस्कार:

  • सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपट: रौप्य शंख आणि 5 लाख रुपयांचे रोख पारितोषिक.
  • सर्वोत्कृष्ट भारतीय  काल्पनिक लघुपट (30 मिनिटांपर्यंत): रौप्य शंख आणि 3 लाख रुपये रोख पारितोषिक.
  • सर्वोत्कृष्ट भारतीय ॲनिमेशन चित्रपट: रौप्य शंख आणि 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक.
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट (प्रायोजित पुरस्कार): चषक आणि रोख बक्षीस 1 लाख रुपये.
  • सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपट (प्रायोजित पुरस्कार): चषक आणि 1 लाख रुपये रोख पारितोषिक.
  • “इंडिया इन अमृत काल”वरील सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष पुरस्कार (15 मिनिटांपर्यंत): केवळ भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी खुला असलेला हा पुरस्कार चषक आणि रोख 1 लाख रुपये स्वरूपात आहे.

तांत्रिक पुरस्कार (राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सामायिक):

  • सिनेमॅटोग्राफी: प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक
  • संकलन : प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस
  • साउंड डिझाइन: प्रमाणपत्र आणि 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस

अतिरिक्त पुरस्कार:

FIPRESCI ज्युरी पुरस्कार: आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षक महासंघ (FIPRESCI)चे प्रतिनिधित्व करणारे तीन प्रतिष्ठित चित्रपट समीक्षक राष्ट्रीय स्पर्धेत माहितीपटाला पुरस्कार प्रदान करतील.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्युरी

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्गजांचे एक प्रतिष्ठित पॅनेल राष्ट्रीय स्पर्धेचे परीक्षण करेल. त्यांचे कौशल्य आणि अनुभव विवेकपूर्ण निवड प्रक्रियेची खातरजमा करेल. या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्युरी सदस्यांमध्ये जर्मन चित्रपट निर्माते ॲडेल सीलमन (दास वेईब रौशेन, ॲलेस ऑफ डाय सिबझेन) चित्रपट निर्माते डॉ. बॉबी सरमा बरुआ (मिशिंग, सोनार बरन पाखी), ॲनिमेटर मुंजाल श्रॉफ (क्रिश, त्रिश आणि बाल्टीबॉय)  निर्माती अपूर्वा  बक्षी (दिल्ली क्राइम) आणि जर्मन चित्रपट निर्माते अण्णा हेंकेल-डॉनर्समार्क यांचा समावेश आहे.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content