Homeचिट चॅट७३ टक्के भारतीय...

७३ टक्के भारतीय प्रवासासाठी वैयक्तिक कार वापरतात!

शहरातच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी भारतीय नागरिकांद्वारे कार्सचा वापर सर्रास केला जातो. सुमारे ७३ टक्के भारतीयांचा प्रवासासाठी वैयक्तिक कार वापरण्याकडे कल असल्याचे एमजी मोटर इंडियाच्या अर्बन मोबिलिटी हॅप्पीनेस सर्व्हेतून निदर्शनास आले आहे.

सर्वेक्षणात सामील ७३ टक्के प्रतिसादकर्त्यांनी आपण दररोज किंवा अधूनमधून कामावर वा कॉलेजमध्ये जाण्यासाठी वैयक्तिक कार वापरतो असे सांगितले. याखेरीज शहरातील कारओनर्स घरगुती कामे, खरेदी, मित्र-नातेवाईकांच्या भेटीगाठींसाठी आणि विकेंड ट्रीप्ससाठी आपल्या गाडीचा वरचेवर उपयोग करत असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले.

हे सर्वेक्षण अहमदाबाद, बेंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली, एनसीआर, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता अशा ८ भारतीय शहरांमध्ये घेण्यात आले. यातील बहुतांश शहरे तिथल्या नागरिकांना आपल्या दैनंदिन प्रवासात येणाऱ्या असंख्य अडचणींसाठी ओळखली जातात. या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या ५००० प्रतिसादकर्त्यांमध्ये १८ ते ३७ वर्षे वयोगटातील व घरात किमान एक कार असलेल्या स्त्री-पुरुषांचा समावेश होता. सर्वेक्षणातून हाती आलेले निष्कर्ष पुढीलप्रमाणे:

पार्किंगसाठीच्या अपुऱ्या पायाभूत सोयीसुविधा ही सामायिक समस्या:

भारतीय शहरांतील कारओनर्ससाठी वाहनाचे पार्किंग करणे ही एक सामायिक समस्या आहे. केवळ २६ टक्के लोकांनी आपल्याला पार्किंगची जागा सहज सापडत असल्याचे सांगितले तर इतर ७४ टक्के लोकांना मात्र आपल्या शहरातील पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि पार्किंग शोधण्याचे व्यवस्थापन याबाबतीत खूप कष्ट घ्यावे लागत असल्याचे दिसून आले. पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने आपण आपल्या कार्स न वापरण्याचा निर्णय घेतल्याचे किंवा पार्किंगच्या उपलब्धतेनुसार आपली कामे बेतून घ्यावी लागत असल्याचे सुमारे ६४ टक्के लोकांनी सांगितले.

केवळ एका सहप्रवाशासोबत प्रवास करण्याला कार ओनर्सची पसंती:

भारतीय शहरांतील बहुतांश कारओनर्समध्ये सामायिक वाहन वापरण्याची रीत फारशी लोकप्रिय नाही. आपण आपल्या गाडीने एकटेच प्रवास करतो किंवा जास्तीतजास्त आणखी एक सहप्रवासी सोबत घेतो असे सुमारे ७१ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले. अवघ्या १ टक्के प्रतिसादकर्त्यांनी आपण नेहमी एकाहून अधिक सहप्रवाशांच्या सोबतीने प्रवास करत असल्याचे सांगितले.

पेट्रोलला अधिक पसंती तर विविध पॉवरट्रेनच्या पर्यायांकडेही लक्ष:

जीवाश्म इंधनाशी संबंधित पर्यावरणीय चिंता वाढत असूनही भारताच्या प्रमुख शहरांतील बऱ्यापैकी लोक अजूनही पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांना अधिक पसंती देतात. सर्वेक्षणानुसार ५० टक्के प्रतिसादकर्त्यांकडे पेट्रोल गाड्या असल्याचे तर ३५ टक्के प्रतिसादकर्त्यांकडे डिझेल गाड्या असल्याचे आढळून आले. असे असूनही कारओनर्सचा पर्यायी पॉवरट्रेन तंत्रज्ञानाकडे वळण्याचा ट्रेण्ड वाढत आहे.

लगेजसाठीच्या जागेचा लॅपटॉप बॅग ठेवण्यासाठी वापर:

सर्वेक्षणांतून उघड झालेल्या माहितीनुसार, सुमारे ७७ टक्के प्रतिसादकर्ते दरदिवशी आपल्या गाडीतील लगेज स्पेसचा वापर करतात. त्यापैकी ८१ टक्के लोक या लगेज स्पेसचा वापर लॅपटॉप बॅग ठेवण्यासाठी करतात.

मोठे अंतर आणि वेळेमुळे शहरातील प्रवास दुख:दायक:

सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी सुमारे ७१ टक्के सहभागींनी आपण कामावर किंवा कॉलेजमध्ये जाण्यासाठी दररोज ३० मिनिटांपासून ते तासभर वेळ खर्च करत असल्याचे सांगितले. प्रवासासाठी लागणारा सरसकट वेळ पाच वर्षांपूर्वीच्या परिस्थितीच्या तुलनेत वाढला असल्याचे दिसत असल्याचे ६१ टक्के लोकांनी मान्य केले.

इंधन दरवाढीचा शहरी प्रवाशांना फटका:

इंधनाच्या वाढत्या किंमतीचा देशभरात सगळीकडेच परिणाम झाला आहे आणि शहरी कारओनर्स त्याला अपवाद नाहीत. इंधन दरवाढीचा आपल्यावर खूप मोठा परिणाम झाल्याचे ५२ टक्के प्रतिसादकर्त्यांनी नोंदविले. तसेच आपण दर महिन्याला इंधनावर ६००० रूपयांहून अधिक खर्च करत असल्याची माहिती ५० टक्के प्रतिसादकर्त्यांनी दिली.

शहरांमधील हवा आणि ध्वनीप्रदूषण चिंतेचे कारण:

हवा आणि ध्वनीप्रदूषण ही बहुतांश शहरी नागरिकांसाठी काळजीची मुख्य बाब आहे.  सर्व्हेच्या निष्कर्षांमध्ये हे अगदी स्पष्टपणे दिसून आले. शहारातील हवा प्रदूषित असल्याचे ८० टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले. तसेच तितक्याच लोकांनी हवेच्या प्रदूषणाचा मुद्दा मान्य करत आपल्या शहरात आवाजाचे प्रदूषणही खूप असल्याचे ठामपणे सांगितले. याखेरीज कार खरेदी करताना आपण पर्यावरण हा महत्त्वाचा मुद्दा म्हणून विचारात घेतो, असे मत ६९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी नोंदविले.

आटोपशीर आकाराच्या स्मार्ट कार्सचा पर्याय:

भारतातील नागरी वाहतुकीसमोरील समस्यांसाठी स्मार्ट मोबिलिटी उपाययोजना हे संभाव्य उत्तर ठरू शकते, असे अनेक काळापासून म्हटले जात आहे. आटोपशीर आकाराची स्मार्ट कार घेतल्यास शहरात प्रवास करण्याचा वेळ कमी होऊ शकेल आणि दरदिवशी प्रवास करताना येणाऱ्या बऱ्याचशा अडचणी सुटू शकतील असे मत जवळजवळ ९० टक्के लोकांनी मांडले.

एमजी मोटर इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर गौरव गुप्ता म्हणाले की, अर्बन मोबिलिटी हॅप्पिनेस सर्व्हेच्या निष्कर्षांनी आम्हाला भारतीय ग्राहकांचे वाहन चालवितानाचे वर्तन आणि वाहतुकीच्या साधनांचे त्यांच्या पसंतीचे पर्याय याविषयी अनमोल अशी सखोल माहिती दिली. कारओनर्स आपल्या गाडीची कामगिरी आणि वैशिष्ट्ये यांच्याबरोबरच सोय, सुरक्षितता आणि एकूणच ड्रायव्हिंगचा अनुभव या गोष्टींनाही प्राधान्य देतात ही गोष्ट या सर्वेक्षणातून स्पष्टपणे दिसून आली आहे. वाहतुकीच्या अद्ययावत उपाययोजना पुरविण्याचा ध्यास असलेला ब्रॅण्ड म्हणून आमच्या ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी मेळ साधण्याचे महत्त्व आम्ही जाणतो.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content