Friday, November 22, 2024
Homeटॉप स्टोरीमहाराष्ट्रासह 4 राज्यांत...

महाराष्ट्रासह 4 राज्यांत रेल्वेच्या 4,000 कोविड बोगी!

सौम्य तसेच म्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोविड रूगणांसाठी रेल्वेने सुमारे 64,000 खाटा असलेल्या 4,000 कोविड सेवा रेल्वेबोगी देशातील विविध रेल्वेस्थानकांवर तैनात केल्या आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्लीत ही सोय उपलब्ध करण्यात आली आहे.

त्यातील काहींनी कोविडच्या पहिल्या लाटेच्या वेळी रुग्णांच्या विलगीकरणाच्या गरजा पूर्ण केल्या आहेत. यासंदर्भात, राज्य सरकारांना त्यांच्या राज्यांतील कोविड सेवा बोगींच्या थांब्याचे ठिकाण, त्याच्या परीचालनासाठी असलेल्या कार्यपद्धती आणि मानक कार्यप्रणाली (एसओपी) यांच्याबद्दल अवगत करण्यात आल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

दिल्लीमध्ये 50 बोगी (800 खाटा  असलेले) शकुरबस्ती स्थानकात तैनात आहेत (सध्या त्यात 4 रुग्ण दाखल आहेत आणि 25 बोगी (400 खाटा  असलेले), आनंद विहार टर्मिनलवर उपलब्ध आहेत. नंदुरबार (महाराष्ट्र) येथे 21 बोगी (378 खाटा असलेले) आणि त्यात 55 रुग्ण सध्या दाखल आहेत. भोपाळ स्थानकात 20 बोगी दाखल झाल्या  आहेत. पंजाबमध्ये 50 बोगी तैनात करण्यासाठी सज्ज आहेत तर जबलपूरमध्ये 20 बोगी तैनात करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारांनी मागणी केल्यास ही विलगीकरण केंद्रे सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या गरजा पूर्ण करतील. या रुग्णांना जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी तसेच या डब्यात स्वच्छता राखण्यासाठी रेल्वे सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सध्या देश कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या संकटाशी सामना करत आहे. अशा वेळी रेल्वे मंत्रालय कोविड-19च्या पहिल्या लाटेदरम्यान तयार करण्यात आलेल्या, कोविड सेवा विलगीकरण  (कोविड केअर आयसोलेशन) बोगीच्या रचनेत अधिक सुधारणा करत ते तैनात करण्याचा  पुनश्च प्रयत्न करत आहे. या बोगी सौम्य लक्षणे असलेल्या कोविड रूग्णांच्या विलगीकरणासाठी अतिरिक्त आरोग्य सेवा म्हणून कार्य करण्यास सज्ज करण्यात आल्या  आहेत. या डब्यांमधून सद्ध्याच्या उष्ण हवामानाच्या पार्श्वभूमीवर कूलर, तागाच्या चटया उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

1 मेपासूनच्या लसीकरणासाठी राज्य/केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शन

दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि कोविड-19चा मुकाबला करण्यासाठी तंत्रज्ञान व डेटा व्यवस्थापनावरील अधिकारप्राप्त गटाचे अध्यक्ष डॉ. आर. एस. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत नव्या लसीकरण कार्यनीतीच्या (टप्पा-3) प्रभावी अंमलबजावणीबाबत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शन करण्यात आले.

कोविन मंच 1 मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या नवीन टप्प्यासाठी सुसज्ज आहे. यावर राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडून योग्य आणि वेळेवर माहिती अपलोड करावी. खासगी रुग्णालये, औद्योगिक प्रतिष्ठानांची रुग्णालये, उद्योग संस्था इ. इत्यादींचा समावेश करून अभियानस्तरावर अतिरिक्त खासगी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांची नोंदणी करत नियुक्त केलेल्या योग्य प्राधिकरणासह समन्वय राखत अर्ज / विनंत्या यासाठी व्यवस्था आणि त्यावरील कृती, प्रलंबित नोंदणीवर देखरेख ठेवावी. लसी खरेदी केलेल्या आणि कोविनवर  किंमती आणि साठा जाहीर केलेल्या रुग्णालयांच्या संख्येवर लक्ष ठेवावे. कोविनवर लसीकरण स्लॉट्सची पुरेशी दृश्यता प्रदान करून पात्र व्यक्तींसाठी लसीकरण वेळापत्रक तयार करावे. राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या लसींच्या थेट खरेदीसंदर्भातील निर्णयाला प्राधान्य द्यावे. 18-45 वयोगटासाठी ‘केवळ ऑनलाइन नोंदणी’च्या सुविधेबद्दल प्रचार करा. लसीकरण, एईएफआय अहवाल देणे आणि व्यवस्थापन याविषयी सीव्हीसी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण द्यावे, लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी गर्दीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी कायदा आणि सुव्यवस्था अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवावा, आदी सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Continue reading

अॅक्शनपॅक्ड ‘राजवीर’चा ट्रेलर लाँच!

पोलिस अधिकाऱ्यानं एखादं ध्येय निश्चित केलं असेल, तर ते पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. अशाच एका ध्येयानं प्रेरित असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची रंजक गोष्ट 'राजवीर' या चित्रपटातून उलगडणार आहे. अॅक्शनपॅक्ड अशा या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात...

प्रतिभाआजी धावल्या नातू युगेंद्रसाठी!

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीसाठी म्हणजेच खासदार सुप्रिया सुळेंसाठी पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत घरोघरी प्रचाराला जाणाऱ्या शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आता नातू युगेंद्र यांच्या प्रचारासाठी बारामतीच्या मैदानात उतरल्या आहेत. आज प्रतिभा पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांचे...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ३०५ कोटींची मालमत्ता जप्त

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू असा एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. सोबत:...
Skip to content